रोझोदा येथील राजेंद्र चौधरी यांना पनवेल येथे पुरस्कार
रोझोदा येथील राजेंद्र चौधरी यांना पनवेल येथे पुरस्कार
लेवाजगत न्यूज सावदा-रोझोदा येथील राजेंद्र तुळशीराम चौधरी यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दलचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिक यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पनवेल येथील क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके सभागृहात आयोजित आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवाँर्ड २०२४ पुरस्कार सोहळा ७ जानेवारी रोजी संपन्न झाला. याप्रसंगी रावेर तालुक्यातील रोझोदा येथील राजेंद्र तुळशीराम चौधरी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दलचा पुरस्कार मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी पनवेलचे खासदार रामशेठ ठाकूर तसेच झी २४ तासचे संपादक निलेश खरे उपस्थित होते.
श्री. चौधरी यांचा स्वलिखित अमृतवेल कवितासंग्रह असून दुसरा कवितासंग्रह दिवा तुळशीरामाचा प्रकाशनाच्या वाटेवर असून ते बोरीवली हरचंद लोखंडे माध्यमिक विद्यालयात तेवीस वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत आहे. पस्तीस वर्षांपासून ते पत्रकारितेत असून भारत २४ तास न्यूजचे पत्रकार म्हणून कार्यरत असून अनेक शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात आर्थिक योगदान ते करीत असतात.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत