राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्षपदी कुंदा वैजनाथ ठाकूर यांची निवड
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्षपदी कुंदा वैजनाथ ठाकूर यांची निवड
लेवाजगत न्यूज उरण :( सुनिल ठाकूर )माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.कुंदा वैजनाथ ठाकूर यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रायगड जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा उमा मुंढे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अभिप्रेत असणारी संघटना उरणमध्ये बांधण्याची त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. सौ. कुंदा ठाकूर या जासई गटाच्या जिल्हा परिषद सदस्या म्हणून भरघोस मतांनी निवडून आल्या होत्या. जि.प. सदस्य असताना त्यांनी दिघोडे आरोग्य केंद्र, दिघोडे सबस्टेशन आदी विकासकामे केली होती. त्यांचे पती वैजनाथ ठाकूर हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत.
त्यांच्या निवडी बद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत