Contact Banner

अजिवली येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ अजिवली पनवेल परिसर तर्फे अखंड हरिनाम उत्सवाचे आयोजन

 

Organized-Akhand-Harinam-festival-by-Sri-Sant-Dnyaneshwar-Mauli-Seva-Mandal-Ajivali-Panvel-Parisar-at-Ajivali

अजिवली येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ अजिवली पनवेल परिसर तर्फे अखंड हरिनाम उत्सवाचे आयोजन

लेवाजगत न्यूज उरण(सुनिल ठाकूर )अजिवली येथील भव्य दिव्य असे नियोजन बद्द असे आयोजन असणाऱ्या या अखंड हरिनाम उत्सव म्हणून नावारूपाला आले असताना यावर्षी देखील सोमवार दिनांक 8 जानेवरी 2024 ते 15जानेवारी 2024 या काळावधीत ज्ञानेश्वरी कंठ भूषण हभपशांती ब्रम्हा एकनाथ जी महाराज कोष्टी (देवाची आळंदी ) यांच्या व्यासपीठ नेतृत्वा खाली अजिवली येथील भव्य मैदानावर अखंड हरिनाम उत्सवा चे आयोजन करण्यात आले आहे.

या आठ दिवसांत 4ते 6 काकडं आरती सकाळी 8 ते 12 ज्ञानेश्वरी पारायण दुपारी 3 ते 4 प्रवचन संध्याकाळी 6 ते 7 हरिपाठ रात्रौ 9 ते 11 या कालावधीत हरिकीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम असणार आहेत.

 सोमवार दिनांक 8/1/2024 दुपारी 3 ते 4 हभप संतोष महाराज सते (भाताण )यांचे प्रवचन रात्रौ 8 ते 11 हभप कैलास महाराज निचिते (शहापूर )यांचे हरिकीर्तन.

मंगळवार दिनांक 9/1/2024 दुपारी 3 ते 4 हभप जग्गनाथ महाराज शिवकर (केळवणे )यांचे प्रवचन. रात्रौ 9 ते 11 अमृता श्रम स्वामी  महाराज जोशी बाबा (बीड )यांचे हरिकीर्तन.

बुधवार दिनांक 10/1/2024 दुपारी 3 ते 4 हभप हेमंत महाराज दुर्गे (शेंडुंग ) यांचे प्रवचन. रात्रौ 9 ते 11 हभप पुरुषोत्तम महाराज पाटील (बुलढाणा )यांचे हरिकीर्तन. गुरुवार दिनांक 11/1/2024  हभप बंधुराज     महाराज जाभळे (चांभांर्ली )यांचे प्रवचन. रात्रौ 9 ते 11 हभप चेतन्य महाराज निंबोळे (नाशिक )यांचे हरिकीर्तन.शुक्रवार दिनांक 12/1/2024 दुपारी 3ते 4 हभप अजित महाराज खुटले (नांदगाव )यांचे प्रवचन. रात्रौ 9 ते 11 हभप सुधाकर महाराज वाघ श्री क्षेत्र पैठण यांचे हरिकीर्तन.शनिवार दिनांक 13/1/2024 दुपारी 3 ते 4 हभप निलेश महाराज ढवळे (शिवकर )यांचे प्रवचन रात्रौ 9 ते 11 श्री गुरु पुंडलिक महाराज देहूकर (देहू )यांचे हरिकीर्तन. शनिवार दिनांक 14/1/2024 दुपारी 3 ते 4 हभप सच्चीदानंद महाराज कांबेकर यांचे प्रवचन रात्रौ 9 ते 11 हभप भाषा प्रभू ऍड.चिदंबरेश्वर  महाराज साखरे साधका श्रम देचाची आळंदी यांचे हरिकीर्तन होणार तर या अखंड हरिनाम उत्सवाची सांगता सोमवार दिनांक 15/1/2024 रोजी सकाळी 10 ते 12 हभप    महाराज कंधारकर (पंढरपूर ). यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे तरी सर्वांनी या अखंड हरीनाम उत्सवाला उपास्थित राहून कीर्तन रुपी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळा च्या वतीने अध्यक्ष हभप संजय मंगल पाटील,उपाध्यक्ष संजय विष्णू भगत, कार्याध्यक्ष डॉ. रविंद्र राऊत, खजिनदार हभप चंद्रकांत गोजे, संपर्क प्रमुख हभप सुभाष गायकर यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.