Contact Banner

प्रथम एज्युकेशन फाउंडेशन संस्थेच्या उसर्ली,पनवेल सेंटर येथे "संवादकौशल्य कार्यशाळेचे आयोजन"

 

Pratham-Education-Foundation- Organized-Communication-Skills-Workshop-at-Usrli-Panvel-Center-


प्रथम एज्युकेशन फाउंडेशन संस्थेच्या उसर्ली,पनवेल सेंटर येथे "संवादकौशल्य कार्यशाळेचे आयोजन"

लेवाजगत न्यूज उरण (सुनिल ठाकूर )व्यसनाच्या आहारी जाऊ नका. त्यामुळे आपण प्रेझें टेबल होऊ शकत नाही. व्यसन हे मृगजळ आहे. ताण तणाव कमी करण्यासाठी ते उपयोगी पडत नाही." असा मोलाचा  उपदेश विद्यार्थ्यांना सौ. विजयालक्ष्मी सणस( सौ. आस) लेखिका, निवेदिका व तज्ज्ञ मार्गदर्शक यांनी केला. महाराष्ट्र लोककल्याणकारी सेवा संस्था यांच्या विशेष सहकार्याने प्रथम एज्युकेशन फाउंडेशन उसर्ली पनवेल व अमरदीप बाल विकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संवाद कौशल्य कार्यशाळेत त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या," शिक्षकांनी मागील बाकावरील विद्यार्थ्यांचे टॅलेंट शोधून ते फुलवले पाहिजे. संवाद हा प्राणवायू आहे. ऊर्जा नवनिर्मितीसाठी तो फुलवला पाहिजे. वादाचे संवादात रूपांतर करून प्रगतीसाठी सुसंवाद साधला पाहिजे. संवाद सध्या हरवत चालला आहे. संवाद नात्याला ओलावा देतो. संवादाने चैतन्य येते.वातावरण बदलते. संवाद ही कला आहे. आत्मविश्वासाने ती साध्य करता येते.  विद्यार्थ्यांना ग्राहकाशी संवाद कसा साधावा हे विशद करताना त्यांनी सांगितले की, ग्राहकाचे स्मित हास्याने स्वागत करा. आपली चूक स्वीकारा. ग्राहकाच्या कलाने घ्या. ग्राहकाच्या भाषेत बोला. वाद टाळा. परिचारिकांना त्यांनी रुग्णाशी कसे वागावे, याबाबत मौलिक मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना बोलते करून सौ. आस यांनी त्यांच्याशी  मोकळेपणाने संवाद साधला. प्रथम एज्युकेशन फाउंडेशन संस्थेत पणवेल सेंटर मध्ये प्लंबिंग, मोटर मेकॅनिक, नर्सिंग हाँटेलमँनेज मँन्ट व इलेक्ट्रिशियनचे प्रशिक्षण दिले जाते . सौ. आस यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यवसायातील उदाहरणे देऊन भाषणात रंगत आणली. सुरुवातीला जनजागृती ग्राहक मंचाचे अध्यक्ष श्री. काशिनाथ जाधव यांनी ग्राहक चळवळ, ग्राहक कायदा व ग्राहक आयोग याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. आपण प्रत्येक जण जन्मापासून मृत्यूपर्यंत ग्राहकच असतो हे त्यांनी विशद केले. ग्राहकाच्या हक्काविषयी कशी जागरूकता दाखवावी, हे त्यांनी विविध उदाहरणांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र कल्याणकारी सेवा संस्था व अमरदीप बाल विकास फाउंडेशनचे सर्वेसर्वा एन.डी.खान यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी अंबोले यांनी केले.   कार्यक्रमांतर्गत अमरदीप बालविकास  फाऊंडेशनच्या तर्फे प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या पनवेल सेंटरच्या स्टाफ व शिक्षकवृदांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे कार्यशाळा समन्वयक ्पुनम गुप्ता, राजकुमार ताकमोगे, रमेश चव्हाण व निजाम शेख हे  उपस्थित होते. तर प्रमुख उपक्रम समन्वयक मृणालिनी चांदोरकर सेंटर हेड, जयवंती गोंधळी मेंटार, सलमा खान सचिव अमरदीप बाल विकास फाउंडेशन  उपस्थित होत्या. कार्यक्रमास शरीफ खान, सौ. मीना ताकमोगे, जगदीश भगत सेंटर हेड, सपाकीजा आत्तार, मृणाल पवार, शीतल भामरा इत्यादी मान्यवर उपस्थित होते. आभार प्रदर्शनाने या सुंदर कार्यक्रमाची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.