राज्यावर इंधन तुटवड्याचे संकट? टँकर चालक संपावर ठाम; प्रशासनाकडून कारवाईचे संकेत
राज्यावर इंधन तुटवड्याचे संकट? टँकर चालक संपावर ठाम; प्रशासनाकडून कारवाईचे संकेत
लेवाजगत न्युज :- केंद्र सरकारच्या जाचक अपघात कायद्याविरोधात वाहन चालकांनी संप पुकारला आहे. ह्या संपामध्ये भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रेलियम, इंडियन ऑईल या इंधन कंपन्यांसह इंडियन गॅस बॉटलिंग प्रकल्पातील इंधन वाहतूक करणारे टँकर चालक सहभागी झाले आहेत.
तसेच तेल कंपन्यांनी टँकरचालकांसोबत चर्चा केली. मात्र, बैठकीत कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळे टँकर चालक दुसऱ्या दिवशीही संपाच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे राज्यामध्ये इंधन तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
टँकर चालक आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने अखेर पोलीस प्रशासन आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेत संप मागे न घेतल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले आहे.
एकंदरीत, राज्यात पेट्रोल तुटवडा होणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर सगळ्याच जिल्ह्यात पेट्रोलपंपावर वाहन चालकांची गर्दी उसळली आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेण्याच्या सूचना सरकारने सर्व जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत