सरपंच परिषद रावेर तालुका महिला सचिवपदी सौ. दिपाली चौधरी
सरपंच परिषद रावेर तालुका महिला सचिवपदी सौ. दिपाली चौधरी
लेवाजगत न्युज रावेर:- सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र संघटनेच्या रावेर तालुका महिला सचिवपदी लहान वाघोदा येथील प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ. दिपाली जितेंद्र चौधरी ( मॅडम ) यांची निवड करण्यात आली.
याबाबत विवरे येथील जागृत हनुमान मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राज्य कोअर कमिटी प्रमुख आबासाहेब सोनवणे पाटील , राज्य कोअर कमिटी सदस्य जे.डी. टिमगिरे ,उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष राजमल भागवत , उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्ष सुषमा दिसले , जिल्हा अध्यक्ष सरपंच परिषद बाळासाहेब धुमाळ , जिल्हा सचिव श्रीकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत