Contact Banner

सतपंथ प्रेरणापीठ मार्फत अकरा टन प्रसाद अयोध्याकडे रवाना -महामंडलेशवर जनार्दन हरिजी महाराज यांची माहिती

Satapantha-prēraṇāpīṭha-mārphata-akara-ṭana-prasāda-ayōdhyākaḍē-ravānā--mahāmaṇḍalēśavara-janārdana-harijī-mahārāja-yān̄cī-māhitī


सतपंथ प्रेरणापीठ मार्फत अकरा टन प्रसाद अयोध्याकडे रवाना -महामंडलेशवर जनार्दन हरिजी महाराज यांची माहिती

लेवाजगत न्यूज फैजपूर-अयोध्या येथील श्री रामलल्ला मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सव दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होत आहे. यासाठी अयोध्या येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सतपंथ संप्रदायाचे मुख्य स्थान असलेले तीर्थधाम प्रेरणापीठ अहमदाबाद गुजरात येथून जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर देवाचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने व श्री देवजीभाई पटेल ( मुंबई ) यांच्या मार्गदर्शनाने सतपंथ परिवारा मार्फत ११ टन चिक्कीचा प्रसाद पाठवण्यात आला आहे. २५ ग्रॅमचे एक पॅकेट अशी सहा लाख पाकिटे तयार केली आहेत. 

Satapantha-prēraṇāpīṭha-mārphata-akara-ṭana-prasāda-ayōdhyākaḍē-ravānā--mahāmaṇḍalēśavara-janārdana-harijī-mahārāja-yān̄cī-māhitī


यासोबतच अयोध्या येथे आलेल्या संत महात्म्यांच्या भोजन वितरणाची सेवा सुद्धा सतपंथ परिवाराला मिळाली आहे. त्यासाठी शेकडो स्वयंसेवक आयोध्याकडे रवाना झाले आहे. अयोध्यातील ऐतिहासिक आयोजनात प्रसादाची व सेवेची संधी मिळाल्याने सतपंथ परिवारात उत्साहाचे वातावरण आहे असे अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांनी सांगितले. अयोध्या श्रीराम जन्मभूमी आंदोलनात महामंडलेश्वर श्री जनार्दन हरी जी महाराज यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. यामुळेच ५ ऑगस्ट २०२० रोजी झालेल्या भूमिपूजन प्रसंगी सुद्धा निवडक संतांच्या यादीत महाराष्ट्रातून फैजपुर येथील सतपंथ संस्थानचे गादिपती जनार्दन हरि जी  महाराजांचे नाव निमंत्रितांमध्ये अग्रस्थानी होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.