Contact Banner

धर्माची धारणा प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी करावी-डॉ.रवींद्र भोळे

The-perception-of-religion-for-the-welfare-of-beings-should-be-done-by Dr. Rabindra-Bhole


 धर्माची धारणा प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी करावी-डॉ.रवींद्र भोळे 

लेवाजगत न्यूज-उरुळी कांचन(प्रतिनिधी):- राजस, तामस  कर्माचा त्याग करून सात्विक करणे आचरावी. वेदना रहित जीवन जगण्यासाठी तसेच आत्मिक शांतीसाठी सात्विक करणे अत्यंत महत्त्वाची असतात. सात्विक कर्मामुळे अभौतिक व अलौकिक सुखप्राप्ती होऊ शकते.भौतिक जगातील सुखांची लालसा कमी होते. सात्विक कर्मे करण्यासाठी सत्वगुण धारण करावा लागतो, सात्विक कर्मे व्हावे लागते. शुद्ध विचारच धर्माची धारणा करू शकतात. धर्म बाजारावर मिळत नाही. धर्माची धारणा करावी लागते. धर्म समाजासाठी व मनुष्याला अधोगतीपासून वाचवण्यासाठी अध्यात्म अत्यंत महत्त्वाचे आहे. अध्यात्माद्वारे धर्म प्रवृत्ती वाढते. म्हणून अधोगतीपासून परावृत्त होण्यासाठी अध्यात्म महत्त्वाचे आहे असे मत प्रवचनकार ह भ प डॉ.रवींद्र भोळे यांनी व्यक्त केले. तसे जीवनामध्ये यज्ञ , दान तप, कर्म अत्यंत महत्त्वाचे असतात. ह्यामुळेच धर्माची धारणा प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी करावी असे मत ज्येष्ठ प्रवचनकार हभप डॉ.रवींद्र भोळे यांनी व्यक्त केले. सिंगापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह समिती व सिंगापूर भजनी मंडळ यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे यांच्या प्रयोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यापुढे मार्गदर्शन करताना ते म्हणाले की पुरंदरच्या पवित्र भूमीमध्ये अधिक साधू संतांनी ऋषीमुनींनी वास्तव्य केलेले आहे. पूर्व भागात वैद्यकीय सेवा करण्याची संधी मिळून दुष्काळग्रस्त भागात वैद्यकीय सेवा केलेली आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. पुरंदरच्या भूमीतील प्रत्येक देव देवस्थान व आध्यात्मिक क्षेत्रांची सुधारणा केल्यास व त्या क्षेत्रांचे अध्यात्मिक ऑडिट केल्यास पुरंदरचें नाव देशात नव्हे तर जगात प्रसिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. याप्रसंगी वैकुंठवासी ह भ प दत्तोबा हरिभाऊ लवांडे अण्णा माजी सरपंच यांचा संकल्पनेने आणि कै. शंकरराव उरसळ यांच्या प्रेरणेने अखंड हरिनाम सप्ताह २०२३ सप्ताहात कानिफनाथ दत्तोबा लवांडे यांच्या सौजन्याने हरिभक्त पारायण डॉ. रवींद्र भोळे महाराज यांना खास सन्मानचिन्ह देण्यात आले. याप्रसंगी सिंगापूर भजनी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कोरडे, पुरंदर शिक्षक प्रसारक  मंडळ वाघापूरचे संचालक लक्ष्मणराव उरसळ, संभाजी लवांडे सर, माऊली कोरडे, दशरथ लवांडे, सोमनाथ ढम, व्यासपीठ चालक, अखंड हरिनाम सप्ताहातील महाराज टाळकरी विणेकरी व भाविक भक्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.