Header Ads

Header ADS

३६ वर्षीय महिला चाळीसगाव शहरातून झाली बेपत्ता

 

A 36-year-old-woman-went-missing-from-Chalisgaon-city

३६ वर्षीय महिला चाळीसगाव शहरातून झाली बेपत्ता

वृत्तसंस्था  चाळीसगाव -शहरातील पुष्पक कॉलनी येथून ३६ वर्षीय महिला घरात कुणाला काहीही न सांगता निघून गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सुनिता अजय सपकाळे वय ३६ रा. पुष्पक कॉलनी, चाळीसगाव असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, चाळीसगाव शहरातील पुष्पक कॉलनी परिसरात सुनिता सपकाळे ही महिला वास्तव्याला आहे. मंगळवारी २३ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता त्यांनी घरात कुणाला काहीही न सांगता कुठेतरी निघून गेल्या. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध धेतला परंतू त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर मंगळवारी २४ एप्रिल रोजी मध्यरात्री १२.३० वाजता त्यांचे पती अजय जगन्नाथ सपकाळे यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली. त्यांनी दिलेल्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ पंकज पाटील हे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.