Header Ads

Header ADS

गैरफायदा घेत विवाहितेवर जबरी अत्याचार; गुन्हा दाखल

Taking advantage of a married woman, forcing her to commit a crime


गैरफायदा घेत विवाहितेवर जबरी अत्याचार; गुन्हा दाखल

वृत्तसंस्था एरंडोल -तालुक्यातील एका गावातील सासर असलेल्या विवाहिता घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत विवाहितेच्या नातेवाईकानेच जबरी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पतीला माहित पडल्यावर विवाहितेला एरंडोल तालुक्यातील एका गावातील माहेरी पाठवून दिले. याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत अधिक असे की, एरंडोल तालुक्यातील सासर असलेल्या विवाहिता हिचे माहेर नागपूर येथे आहे. तिच्याच नातेवाईक असलेला संशयित हा देखील सासरच्या गावात राहतो. दरम्यान विवाहिता लग्नानंतर सासरी येथे नांदत असतांना संशयित आरोपी हा देखील घराजवळ राहत होता. त्यावेळी तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता. दरम्यान एके दिवशी विवाहिता घरी एकटी असतांना संशयित हा जेवणासाठी विवाहितेच्या घरी गेला होता. त्यावेळी एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर जबरी अत्याचार केला. त्यानंतर त्याने दमबाजी करत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. हा प्रकार विवाहितेने तिच्या पतीला सांगितला. त्यामुळे तिच्या पतीने काहीही एक न ऐकता विवाहितेला नागपूर येथे माहेरी पाठवून दिले. त्यानंतर संशयित आरोपीने विवाहितेला फोन करून गावाकडे ये नाहीतर तुझे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता कासोदा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पांडूरंग पवार हे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.