“लोकसभेच्या ४८ जागांवर काँग्रेस, भाजपकडून मुस्लिमांना प्रतिनिधीत्वच नाही”, वंचितचे रावेर तालुकाध्यक्ष शेख मुश्ताक शेख रशीद यांची टीका
“लोकसभेच्या ४८ जागांवर काँग्रेस, भाजपकडून मुस्लिमांना प्रतिनिधीत्वच नाही”, वंचितचे रावेर तालुकाध्यक्ष शेख मुश्ताक शेख रशीद यांची टीका
लेवाजगत न्यूज सावदा :-स्वतःला धर्मनिरपेक्ष समजणाऱ्या काँग्रेसचा सामाजिक न्याय व हीच का भाजपची सामाजिक समरसता, असा खणखणीत प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे शेख मुश्ताक यांनी सावदा येथे आयोजित अल्पसंख्यांक संवाद मेळावा येथे उपस्थित केला.
महाराष्ट्रात मुस्लिमांची संख्या बारा टक्के आहे. या लोकसंख्येच्या आधारावर लोकसभेच्या ४८ पैकी किमान चार ते पाच जागा मुस्लीम समाजाला मिळायला हव्यात. परंतु, काँग्रेस व भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी मुस्लीम समाजाला लोकसभेची उमेदवारी दिली नाही. हाच काय काँग्रेसचा सामाजिक न्याय व हीच का भाजपची सामाजिक समरसता, असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष शेख मुश्ताक शेख रशीद यांनी सावदा येथे आयोजित अल्पसंख्यांक संवाद मेळावा येथे उपस्थित केला.
याप्रसंगी शेख मुश्ताक म्हणाले, काँग्रेसला सामाजिक न्यायचा नारा देण्यासाठी ७० वर्षे का लागली? जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी असे आज काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणत असले तरी महाराष्ट्रात १२ टक्के मुस्लिमांची संख्या असताना मुस्लीम समाजाच्या एकाही नेत्याला काँग्रेसने उमेदवारी दिलेली नाही, हे अतिशय वाईट आहे. भाजपला केंद्रात सत्तेत एक मिनिट राहण्याचा अधिकार नाही. मंदिर-मस्जिद बांधने सरकारचे काम नाही. भाजप लोकांना यातच गुंतवून ठेवत आहे. या पक्षानेही एकही जागेवर मुस्लीम उमेदवार दिला नाही. वंचित बहुजन आघाडी हा तिसरा पर्याय योग्य आहे. वंचित बहुजन आघाडी ही बी टिम नाही तर खऱ्या अर्थाने वंचितांचे प्रश्न लोकसभेत लावून धरणारी, वंचितांना न्याय देणारी ॲड.प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी आहे, आज वंचित बहुजन आघाडी ने मुस्लिम माणसे प्राबल्य ओळखून त्यांचा योग्य तो सन्मान राखत मुस्लिम समाजासाठी तीन जागा देऊन त्यांचा सन्मान केला आहे असे ही शेख मुश्ताक म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत