Header Ads

Header ADS

बेरोजगारीला कंटाळालेल्या तरुणाने फोडले कऱ्हाडीने EVM मशीन

Bored-out-of-unemployment- youth-broke-the- EVM-machine-with-an-axe


बेरोजगारीला कंटाळालेल्या तरुणाने फोडले कऱ्हाडीने EVM मशीन 

वृतसंस्था नांदेड -लोकसभा मतदार संघात एका तरुणाने चक्क कुऱ्हाडीने ईव्हीएम अर्थात मतदान यंत्र फोडल्याची गंभीर घटना घटली आहे. भैय्यासाहेब येडके असे या तरुणाचे नाव आहे. त्याने आपण हे कृत्य बेरोजगारीला कंटाळून केल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेमुळे मतदान केंद्रांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

   लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील 8 जागांवर मतदान होत आहे. यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड व परभणी या मतदारसंघांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर सर्वत्र उत्साहात मतदान सुरू आहे. पोलिस प्रशासन डोळ्यांत तेल घालून निवडणूक प्रक्रिया सुरुळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण बिलोली तालुक्यातील रामतीर्थ गावात एका तरुणाने कुऱ्हाडीने ईव्हीएम फोडण्याची घटना घडल्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

    यासंबंधीच्या वृत्तानुसार, भैय्यासाहेब येडके नामक तरुण शुक्रवारी दुपारी रामतीर्थ येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी आला होता. त्याच्या जवळ कुऱ्हाड होती. ती त्याने लपवून आणली होती. त्याने मतदान करताना अचानक ईव्हीएम व VVPAT मशीनवर कुऱ्हाडीने घाव घातले. या अनपेक्षित घटनेमुळे मतदान कर्मचारी व तिथे उपस्थित असलेल्या मतदारांची एकच घाबरगुंडी उडाली.

   सदर तरुणाने मतदान केंद्रात नियुक्त कर्मचाऱ्यांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. पण त्याची पुष्टी होऊ शकली नाही. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक जगताप यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी तरुणाला ताब्यात घेतले. या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केला नाही. पण पोलिसांनी बंदोबस्तात मोठी वाढ केली आहे. या घटनेनंतर येथील मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याची माहिती आहे. फुटलेल्या मशीनमध्ये जवळपास काही प्रमाणात मतदान झाले होते. पण कंट्रोल युनिट सुरक्षित असल्यामुळे हे मतदान सुरक्षित असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राजेंद्र राऊत यांनी सांगितले.

    आरोपी भैय्यासाहेब येडके हा उच्चशिक्षित आहे. त्याचे एम.ए. पर्यंत शिक्षण झाले आहे. पण त्याला अद्याप रोजगार मिळाला नाही. आपल्यावर ही वेळ या सरकारमुळेच आल्याचा राग धरून त्याने हे कृत्य केले. त्याने स्वतःच ही माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

    लोकसभेच्या नांदेड मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. चव्हाण यांनी नुकतीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवले आहे. तसेच नांदेचची जागा जिंकण्याची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर टाकली आहे. येथे भाजप उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा सामना काँग्रेस उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्याशी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.