Header Ads

Header ADS

मतदानाच्या दिवशी आपले मत देऊन सर्वांनी आपले कर्तव्य पार पाडावे सावदा येथे आठवले बाजारात पथनाट्याद्वारे जनजागृती

Matadānācyā-divaśī-āpalē-mata-dē'ūna- sarvānnī-āpalē-kartavya-pāra-pāḍāvē- sāvadā-yēthē-āṭhavalē-bājārāta- pathanāṭyādvārē-janajāgr̥tī


मतदानाच्या दिवशी आपले मत देऊन सर्वांनी आपले कर्तव्य पार पाडावे सावदा येथे आठवले बाजारात पथनाट्याद्वारे जनजागृती

लेवाजगत न्यूज सावदा -सर्कल कार्यालय ,तलाठी व नगर पालिका यांचा संयुक्तिक आठवडे बाजार येथे मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणुन पथ नाट्याचे आयोजन करण्यात आले.  

    रावेर लोकसभा सार्वत्रिक लोकसभा निवडणूक १३ मे रोजी होणार असून मतदानाची टक्केवारी वाढावी यादृष्टीने मतदार जनजागृतीकरिता सावदा नगर परिषद मुख्याधिकारी भूषण वर्मा यांच्या मार्गदर्शनानुसार विविध कार्यक्रमाच्या व माध्यमांचा वापर करण्यात येत आहे.पथनाट्य हे संदेश प्रसारित करण्याचे अत्यंत प्रभावी माध्यम असून पथनाट्याव्दारे मनोरंजनातून प्रबोधन करण्याची मोठी परंपरा आपल्याकडे आहे. समाज जागृतीचा संदेश हसत खेळत, दैनंदिन जीवनातील उदाहरणे देत लोकांपर्यंत पोहचवणारी पथनाट्ये नेहमीच जनजागृतीचे लोकप्रिय माध्यम राहिलेली आहेत. हे पथनाट्य लोकांची वर्दळ असलेल्या आठवडे बाजार ठिकाणी सादर होत असताना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभल्याचे चित्र पहायला भेटले. या पथनाट्याच्या माध्यमातून भारतीय संविधान, लोकशाहीच्या सबलीकरणात मतदानाचे महत्व, संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार, कर्तव्य म्हणून मतदान करण्याची नागरिकांची जबाबदारी अशा आशयास अनुसरुन मतदान करण्याचे संदेश प्रसारण पथनाट्यांतून करण्यात आले. 

जगात सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्या लोकशाहीकडे पाहिले जाते. या लोकशाहीत सर्व मतदार राजा आहेत आणि देशाचे भविष्य घडवण्यात प्रत्येक मत हे खूप मोलाचे असून मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. या मतदानामुळेच आपल्या देशाची स्थिती बळकट होण्यास मदत होईल. मतदानाच्या दिवशी घरातून बाहेर पडणे आणि मतदान करणे, हे प्रत्येक मतदाराचे कर्तव्य आहे. नागरिकांनी मतदान करून मतदानाचा टक्का वाढवून लोकशाही आणखी बळकट करावी. प्रत्येकाचे मत हे खुप अनमोल असून याची जाणीव प्रत्येकाला होणे गरजेचे आहे. तसेच देशातील श्रीमंत, गरीब प्रत्येक माणसाच्या मताची किंमत ही एकच आहे, असा मोलाचा संदेश या पथनाट्याद्वारे देण्यात आला.या कार्यक्रमास अपर तहसीलदार मयूर कळसे,कार्यालय अधिक्षक सचिन चोळके,क्षेत्रीय अधिकारी विनोद पाटील ,जितेश पाटील ,मंडळ अधिकारी प्रवीण वानखेडे,तलाठी रशीद तडवी, विजय चौधरी तसेच नगर परिषद कर्मचारी,महसूल कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच सदरील ठिकाणी मतदारांना  त्यांचे मतदान कोणत्या मतदान केंद्रावर आहे हे क्यू आर कोड च्या माध्यमातून पाहण्यासाठी मतदार सुविधा केंद्र ठेवण्यात आलेले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.