Header Ads

Header ADS

अनोळखी तरूणाचा धावत्या रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू; ओळख पटविण्याचे पोलीसांचे आवाहन

Police appeal to identify unidentified-youth-run-over-by-train-death


अनोळखी तरूणाचा धावत्या रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू; ओळख पटविण्याचे पोलीसांचे आवाहन

लेवाजगत न्यूज जळगाव -शहरातील प्रजापत नगरातील रेल्वेरूळावर धावत्या रेल्वेसमोर आल्याने एका अनोळखी अंदाजे ३५ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी २९ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयताची ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.

    पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले प्रजापत नगरात रेल्वे रूळ लाईनवर सोमवार २९ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास एका अनोळखी ३५ वर्षीय अनोळखी तरूणाचा धावत्या रेल्वेसमोर आल्याने मृत्यू झाला. याघटनेची माहिती जळगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक यांनी जळगाव तालुका पोलीसांशी संपर्क साधुन घटनेची माहिती दिली. त्यानुसार जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात रवाना केला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माणिक सपकाळे आणि पोहेकॉ विलास शिंदे हे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.