Header Ads

Header ADS

फैजपुरात वृद्धेवर शेजाऱ्यांनी केले अंत्यसंस्कार

 

Neighbors-performed-the- funeral-for-the-elderly-in- Faizpur

फैजपुरात वृद्धेवर शेजाऱ्यांनी केले अंत्यसंस्का

लेवाजगत न्यूज प्रतिनिधी | फैजपूर शहरातील दत्त मंदिरा जवळ गेल्या ४० वर्षांपासून एकट्याच राहणाऱ्या निराधार वृद्ध महिलेचे वृद्धापकाळाने शनिवारी (दि.२०) निधन  झाले. तिला जवळचे असे कोणीही नसल्याने शेजाऱ्यांनी मिळून सामाजिक बांधिलकी जपत वृद्धेवर विधिवत अंत्यसंस्कार केले. दोन महिन्यांपासून आजारी असलेल्या या वृद्ध महिलेवर डॉ. उमेश चौधरी यांनी मोफत उपचारही केले होते. कुमुद वामन भारंबे (वय ६७) असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. ती एकटीच राहत होती. शहरात राहत असताना स्वतःचा उदरनिर्वाहासाठी ती एकटीच प्रयत्न करत होती. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून ती आजारीच होती.  

 डॉ. उमेश चौधरी यांनी तिच्यावर मोफत उपचार केले होते . शेजारी राहणारे संजय रामकृष्ण व हितेश संजय चौधरी यांनी वेळोवेळी आजारपणात या वृद्ध महिलेची विचारपूस करून काळजी घेतली. त्या शेजारी एकटी राहत असल्याने सर्व व्यवस्था, काळजी चौधरी यांनी पाहिली. या वृद्ध महिलेचे गेल्या शनिवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. तिची अत्यंत गरिबीची परिस्थिती होती.अशावेळी हितेश चौधरी, डॉ. चौधरी, पप्पू चौधरी, राजू महाजन, मोहन महाजन यांनी पुढाकार घेऊन वृद्ध महिलेचे अंत्यसंस्कार विधी दक्षिण बाहेर पेठमधील स्मशानभूमीत केले. हितेश चौधरी यांनी त्यांच्या पार्थिवास अग्नि डाग दिला. शेजाऱ्यांनी दाखवलेल्या बांधिलकीबद्दल कौतुक होत आहे. कुमुद भारंबे ह्या स्वातंत्र्यसैनिक डॉ. वामन विठू भारंबे यांच्या कन्या होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.