पत्नीची फारकत; पतीची गळफास घेत आत्महत्या
पत्नीची फारकत; पतीची गळफास घेत आत्महत्या
प्रतिनिधी यावल-तालुक्याती फैजपूर शहरातील दक्षिण बाहेर पेठ भागातील ३३ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. त्याच्या पत्नीने चार दिवसांपूर्वीच पंच फारकत घेतली होती. त्या नैराश्यात तो होता आणि त्याच नैराश्यातून शनिवारी त्याने दारूच्या नशेत गळफास घेतला. सुरेश मुरलीधर कोळी (वय ३३) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.
दक्षिण बाहेर पेठ येथे सुरेश कोळी हा कुटुंबासह राहत होता. दरम्यान कौटुंबिक कलहातून त्याची पत्नी कोमल कोळी हिने चार दिवसांपूर्वीच पंच फारकत घेतली होती. त्यामुळे सुरेश कोळी हा नैराश्य होता. तेव्हा या नैराश्यातून दारूच्या नशेत शनिवारी त्याने आपल्या राहत्या घरातच गळफास घेतला. हा प्रकार वडील मुरलीधर कोळी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यास तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणले, तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी मुरलीधर कोळी यांनी दिलेल्या खबरीवरून फैजपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नीलेश वाघ यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार रशीद तडवी करत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत