रक्षा खडसे माझी सून नसून मुलगी आहे मी विजयासाठी प्रयत्न करणार -एकनाथ खडसे
रक्षा खडसे माझी सून नसून मुलगी आहे मी विजयासाठी प्रयत्न करणार -एकनाथ खडसे
लेवाजगत न्यूज मुक्ताईनगर -रक्षा खडसे यांनी मागील काळात चांगले काम केल्याने, रक्षा खडसेंना त्यामुळेच पक्षाने विश्वास दाखवत तिसऱ्या वेळी उमेदवारी दिली आहे, असे खडसेंनी पत्रकारांना सांगितले. जनतेनेही त्यांना चांगला प्रतिसाद आजपर्यंत दिला आहे त्यामुळे त्या विजयी होतील, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे.
आ.एकनाथ खडसे म्हणाले की, आपला भाजप प्रवेश अद्याप झाला नसला तरी आपण भावी काळात भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत. त्यामुळे रक्षा खडसे यांच्या विजयासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आ. एकनाथ खडसे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीतील नेत्यांच्या आशीर्वादामुळे, केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्वामुळे त्यांना पुन्हा एकदा तिकीट मिळाले आहे. एवढ्या लहान वयामध्ये ३६ व्या वर्षी त्या तिसऱ्यांदा खासदार होण्याच्या तयारीमध्ये आहेत. मी त्यांना शुभेच्छा देतो.
रक्षा खडसे या माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत. त्या माझ्या सून नाही तर मुलगी आहे. सर्वांच्या सहकार्यामुळे रक्षा खडसे या अधिक चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील असा मला विश्वास आहे. रक्षा खडसे यांनी दहा वर्ष पार्लमेंटमध्ये आणि मतदारसंघामध्ये अत्यंत चांगले काम केले. विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न पार्लमेंटमध्ये मांडले, असेही आमदार खडसे यांनी म्हटले आहे.
खा.रक्षा खडसे म्हणाल्या की, शुभकार्य करत असतो त्यावेळी ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत असतो. आज तिसऱ्यांदा अर्ज भरत असताना सर्वांचे आशीर्वाद घेणार आहे. एकनाथ खडसे प्रचार सभेला उपस्थित राहणार नाहीत. मात्र, ते त्यांच्या पातळीवर प्रचाराचं काम करतील. गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांचे देखील आशीर्वाद घेणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत