Header Ads

Header ADS

सावदा येथे विविध मंदिरांसह श्री स्वामीनारायण मंदिरात हनुमान जन्मोत्सव होणार उत्साहात साजरा

 

Savada-with-various-temples-Shri-Swaminarayan-Temple-Hanuman-birthday-will-be-celebrated-with-enthusiasm

सावदा येथे विविध मंदिरांसह श्री स्वामीनारायण मंदिरात हनुमान जन्मोत्सव होणार उत्साहात साजरा 

लेवाजगत न्यूज सावदा- येथील  १०९ वर्ष पुरातन  वडताल धाम अंतर्गत असलेल्या श्री स्वामीनारायण मंदिरात हनुमान जयंती निमित्त सकाळी मंगळवार सकाळी सात वाजता हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. तरी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कोठारी शास्त्री भक्ती किशोर दासजी, सत्यप्रकाश स्वामी, लक्ष्मीनारायण स्वामी यांनी केले आहे.

शहरातील गांधी चौक ,पाटील पुरा, ओम कॉलनी, निमजाई माता नगर ,स्वामीनारायण नगर ,रावसाहेब प्रेमचंद नगर ,कोष्टी वाडा, प्लॉट परिसर, क्रांती चौक, साळीबाग अशा विविध परिसरात हनुमान जन्मोत्सव मंगळवार सकाळी मोठ्या उत्साहात साजरा होईल.

    अक्षय तृतीय निमित्त सामूहिक घागर भरणे कार्यक्रमात सहभाग नोंदवा

   दिनांक १० मे रोज शुक्रवार या दिवशी अक्षय तृतीया असल्याने या दिवशी मागील वर्षाप्रमाणे यावर्षी ही श्री स्वामीनारायण मंदिर प्रांगणात सामूहिक घागर भरणी कार्यक्रम होणार आहे. तरी यात हरिभक्तांना   आपल्या पूर्वजांच्या घागर भरणी बाबत सहभाग नोंदवायचा असल्यास श्री स्वामीनारायण मंदिर येथे संपर्क साधावा असे आवाहन कोठारी शास्त्री व ट्रस्टी यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.