सावद्यात मंगळवारी मरीआईच्या यात्रेनिमित्त बारा गाड्या तर हनुमान जयंतीनिमित्त संध्याकाळी भव्य शोभायात्रा मिरवणूक
सावद्यात मंगळवारी मरीआईच्या यात्रेनिमित्त बारा गाड्या तर हनुमान जयंतीनिमित्त संध्याकाळी भव्य शोभायात्रा मिरवणूक
लेवा जगत न्यूज सावदा- येथे दरवर्षाप्रमाणे चैत्र शुद्ध पौर्णिमेला ग्रामदैवत मरीआई यात्रेनिमित्त बारा गाड्या ओढल्या जातात तर क्रांती चौकातील हनुमान मंदिरापासून गेल्या तीन-चार वर्षांपासून भव्य दिव्य अशी आकर्षक मिरवणूक श्री हनुमंत महाराज यांच्या पुतळ्यासह निघत असते या दोघं कार्यक्रमास परिसरातील नागरिक बंधू भगिनी व भाविकांनी उपस्थिती द्यावी व या धार्मिक उत्सवाचा आनंद लुटावा असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
हे पण वाचा-सावदा येथे विविध मंदिरांसह श्री स्वामीनारायण मंदिरात हनुमान जन्मोत्सव होणार उत्साहात साजरा >>
दरवर्षीप्रमाणे गेल्या कित्येक वर्षापासून चैत्र शुद्ध पौर्णिमेला ग्रामदैवत मरीआईच्या यात्रेनिमित्त बारा गाड्या ओढल्या जातात यावर्षी या बारा गाड्या भगत गणेश गोपाळ चौधरी हे ओढणार असून त्यांच्यासोबत प्रभाकर तेली,सुरेश तेली, भागवत तेली, किरण तेली, सोमा टोके, खेमा चौधरी ,वसंत ओतारी, संतोष तेली, छोटू चौधरी, प्रशांत तेली, राजू तांबटकर, नंदू तांबटकर, सुनील चौधरी, प्रमोद तेली, कपिल तेली, प्रमोद चौधरी हे मदतीला कार्य करणार आहे. बारा गाड्या मस्कावद रोड परिसरात ओढल्या जात असून ,मंगळवार रोजी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला या बारा गाड्या ओढल्या जातील. त्याआधी तेलीवाडी वाडा परिसरातून नवरत्न निघेल. नवरत्न शहराच्या प्रमुख मार्गावरून ग्रामदैवत मरीआईच्या मंदिरावर येईल तिथे विधीवत पूजा होऊन बारा गाड्या ओढल्या जातील. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
हनुमान जयंती निमित्त भव्य दिव्य अशी सावद्यात मिरवणूक निघणार
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही क्रांती चौकातील उत्तर मुखी हनुमान मंदिरापासून ,हनुमान उत्सव समितीतर्फे भव्य दिव्य अशा मिरवणुकीचे आयोजन संध्याकाळी सहा वाजता पासून दहा वाजेपर्यंत करण्यात आले आहे. या मिरवणुकीत उत्कृष्ट असा कसरतीचा आखाडा अग्रस्थानी राहणार असून महाबली हनुमान ची आकर्षक मूर्ती ही असणार आहे. बेंजो च्या तालावरती भव्य दिव्य अशी ही मिरवणूक क्रांती चौक,इंदिरा गांधी चौक,छत्रपती संभाजी चौक,चांदणी चौक मार्गे गांधी चौक,गवत बाजार मार्गे माळी वाडा रविवार पेठ,छत्रपती शिवाजी महाराज चौक,वंजारी वाडी, कॉर्नर रोड, सुभाष चौक मार्गे पाटील पुरा शहराच्या या मार्गाने बघण्यासाठी व आपला आनंद लुटण्यासाठी परिसरासह शहरातील नागरिक बंधू-भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन उत्सव समितीचे अध्यक्ष पृथ्वी भंगाळे,पप्पू जोगी ,शुभम चौधरी , कौशल धांडे व समितीच्या सर्व सदस्यात मार्फत करण्यात आले आहे.
सर्व भाविकांनी आपला कार्यक्रम समजून हा कार्यक्रम शांततेत पार पाडावा असे आवाहनही सावदा पोलीस ठाण्याचे सपोनि जालिंदर पळे यांचे सह आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत