Header Ads

Header ADS

सावदा नगरपरिषद मार्फत शहरातील महिलांसाठी मतदार जनजागृती कार्यशाळा जास्त टक्केवारीने मतदान करणाऱ्या गट किंवा मंडळास प्रमाणपत्र देण्यात येईल- मुख्याधिकारी भूषण वर्मा

 

Voter-awareness-workshop-for-women-voters-in-the-city-through-Savada Municipal Council-Certificates-will-be-given-to-groups-or-mandals-voting-with-a-higher-percentage-by-Chief-Officer-Bhushan-Verma

सावदा नगरपरिषद मार्फत शहरातील महिलांसाठी मतदार जनजागृती कार्यशाळा

जास्त टक्केवारीने मतदान करणाऱ्या गट किंवा मंडळास प्रमाणपत्र देण्यात येईल- मुख्याधिकारी भूषण वर्मा

लेवाजगत न्यूज सावदा - नगरपालिकेत मार्फत शहरातील महिलांसाठी जनजागृती कार्यशाळा व मतदान वाढीबाबत मार्गदर्शन पालिकेच्या बैठक हॉलमध्ये आज शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता  आयोजन करण्यात आले होते.

    मुख्याधिकारी भुषण वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा शहरातील महिलांनी मतदान प्रक्रियेमध्ये जास्तीतजास्त प्रमाणात सहभागी व्हावे याकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते.

      या कार्यशाळेसाठी शहरातील बचत गटातील महिलांचे प्रतिनिधी म्हणुन बचत गटाचे अध्यक्ष व सचिव याना आमंत्रित करण्यात आले होते.

       मुख्याधिकारीवर्मा  यांनी नगरपरिषद तर्फे १००% मतदान हे ध्येय लक्षात ठेऊन स्पर्धेचे आयोजान केलेले आहे. महिलांना जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्यासाठी आवाहन केले तसेच बचत गटातील व कुटुंबातील ८५% सदस्यांनी मतदान केल्यास कास्य प्रमाणपत्र तसेच ८६% ते ९५% सदस्यांनी मतदान केल्यास त्यांना रजत प्रमाणपत्र तसेच ९६% ते १००% सदस्यांनी मतदान केल्यास त्यांना सुवर्ण प्रमाणपत्र देण्यात येईल याबाबत मार्गदर्शन केले.

    शहरात चौका-चौकात व मोक्याच्या ठिकाणी QR CODE लावण्यात आलेले आहे. त्या माध्यमातुन शहरातील मतदार आपले नाव मतदार यादीमध्ये शोधू शकतात तसेच मतदानाचे ठिकाण याबाबत सुद्धा माहिती मतदारांना मिळेल. नगरपरिषद मार्फत आठवडे बाजारात मतदान कक्ष स्थापन करून त्याठिकाणी शहरातील मतदार आपली मतदानाबाबतची स्लीप घेऊ शकतात याबाबत मार्गदर्शन केले. सावदा शहरातील दिव्यांग मतदार बांधावानकारीता नगरपरिषद तर्फे प्रत्येक मतदान केंद्रावरती व्हील चेअर ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच ८५ वर्षा वरील वयोगटातील मतदार याना घरून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

     उपस्थित सर्व महिलांना मतदान बाबतची प्रतिज्ञा देण्यात आली. या कार्यक्रमास  मुख्याधिकारी भुषण वर्मा , कार्यालय अधिक्षक सचिन चोळके, लेखापाल विशाल पाटील , सहा.प्रकल्प अधिकारी संदीप पाटील, समुदाय संघटक महेश इंगळे, शहर समन्वयक अरुणा चौधरी, संगणक तंत्रज्ञ धिरज बनसोडे, वरिष्ट शिपाई राजेंद्र मोरे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.