Contact Banner

भुसावळ तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार : तरुणाविरोधात गुन्हा


   भुसावळ तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार : तरुणाविरोधात गुन्हा 


लेवाजगत न्युज भुसावळ:- भुसावळ तालुक्यातील एका गावातील चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगी अत्याचारातून गर्भवती राहिल्याची संतापजनक घटना समोर आली असून तरुणाविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला व त्यास अटक करण्यात आली आहे.


पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर संशयीत निलेश संजु निळे या तरुणाने सात महिन्यापूर्वी (दिवस व वेळ निश्चित माहित नाही) अत्याचार केला.त्यानंतर वारंवार पीडीतेवर अत्याचार केला  त्यातून पीडीता गर्भवती राहिली. पीडीतेच्या आईच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर संशयीत निलेश संजु निळे विरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.पोलीस निरीक्षक जनार्धन खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.