चिनावल येथे नवनगर मित्र मंडळाची स्वराज्य बँड खर्डे याने केली फसवणूक.. फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
चिनावल येथे नवनगर मित्र मंडळाची स्वराज्य बँड खर्डे याने केली फसवणूक.. फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
लेवाजगत न्यूज चिनावल-दिनांक १३ रोजी चिनावल येथे नवनगर मित्र मंडळ दुर्गा देवी विसर्जनाची सांगता होती. मंडळांनी विसर्जन मिरवणुकी करिता स्वराज्य बँड खर्डे तालुका देवळा जिल्हा नाशिक हे बँड पथक ठरविले होते. सदरचे बॅंडवाल्यास त्यांनी वीस हजार रुपये ऍडव्हान्स रक्कम देऊन सुद्धा बँड मालक विसर्जनाच्या दिवशी वाजवण्यास हजर राहिलेला नाही.त्यामुळे मंडळाचे ५० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. मंडळातील महिलांचा रोष व्यक्त होत आहे.तरी सदर बँड पथक मालक विशाल जाधव यांनी आर्थिक नुकसान करून फसवणूक केली असता त्यांच्याकडून नुकसान भरपाई करून द्यावी असा अर्ज नवनगर मित्र मंडळ यांच्या वतीने सावदा पोलीस ठाण्यात दाखल केला गेला. तरी मंडळाकडून बँड मालकावर योग्य ती कारवाईची मागणी पोलिसांकडे केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत