Header Ads

Header ADS

वरणाच्या गरम पातेल्यामध्ये 3 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दवी मृत्यू


 वरणाच्या गरम पातेल्यामध्ये 3 वर्षीय चिमुकल्याचा पडून दुर्दवी मृत्यू

लेवाजगत न्युज संभाजी नगर:- वाढदिवसासाठी तयार करण्यात आलेल्या वरणाच्या गरम पातेल्यामध्ये पडून एका तीन वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवार १५ ऑक्टोबर रोजी वाळूज परिसरामध्ये घडली. या घटनेनंतर परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

घराच्या अंगणात स्वयंपाक सुरू होता

वंश योगेश हरकळ, वय ३, राहणार सिडकोवाळूज महानगर असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश हरकळ हे फोटोग्राफर असून त्यांना दोन लहान मुलं आहेत. सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी योगेश यांच्या भावाच्या मुलीचा पहिला वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त घराच्या अंगणामध्ये स्वयंपाक तयार करण्यात आला होता. जेवणात तयार करण्यात आलेलं वरणाचं पातेलं घरातील पलंगाच्या खाली ठेवण्यात आलं होतं.


पलंगावर चढताना वंश गरम पातेल्यात पडला

यावेळी तिथेच खेळत असलेला वंश पलंगावर चढण्यासाठी वरणाच्या पातेल्यावर पाय देऊन पलंगावर चढण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी झाकण उघडल्याने वंश गरम वरण असलेल्या पातेल्यात पडला. गमर वरणात पडल्यानंतर तो भाजला गेला. भाजल्यामुळे तो जोरात किंचाळला. त्याला तात्काल बाहेर काढत नातेवाईकांनी तातडीने खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं



मंगळवारी पहाटे तीन वाजेपर्यंत चिमुकला वंश आई - वडिलांशी बोलत होता. तो सतत मला इथे राहायचं नाही, मला घरी घेऊन चला असं तो सतत त्याच्या आई - वडिलांना सांगत होता. त्यानंतर तो काहीवेळ निपचित पडून राहिला. मात्र सकाळी डॉक्टरांनी तपासलं असता त्याला मृत घोषित केलं. अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकल्याचा अशा पद्धतीने दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.