Contact Banner

उत्पादन शुल्क उपनिरीक्षकाने मागितली लाच,पंटर जाळ्यात

उत्पादन शुल्क उपनिरीक्षकाने मागितली लाच,पंटर जाळ्यात


उत्पादन शुल्क उपनिरीक्षकाने मागितली लाच,पंटर जाळ्यात

लेवाजगत न्यूज भुसावळ- पकडलेल्या दारूसाठ्घाबाबत त्रास देऊ नये आणि दारूची केस करू नये म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागातील उपनिरीक्षक किरण सोनवणे यांनी १० हजाराची रक्कम घेत केस न करण्यासाठी पुन्हा ५० हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराच्या फिर्यादीवरून व शहरातील हुडको कॉलनीतील किरण माधव सूर्यवंशी या खाजगी पंटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी लाच घेताना फैजपूरला रस्त्यावर रंगेहाथ पकडले. तर उपनिरीक्षक सोनवणे पसार आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अवैध दारू विक्रीबाबत तक्रारदाराच्या घरी छापा टाकला होता. तक्रारदाराकडे ३० ते ३५ हजाराची दारू जप्त केली होती. दारूची केस न करण्यासाठी १० हजार रुपये घेतले होते. पुन्हा ५० हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने शुक्रवारी जळगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली या तक्रारीची खात्री करण्यात आली. याप्रकरणी ५७ हजाराची मागणी केली होती, मात्र, ३० हजार रुपये स्विकारताना शुक्रवारी किरण सूर्यवंशी या खाजगी पंटरला पथकाने अटक केली. याप्रकरणी उपनिरीक्षक किरण सोनवणे पसार आहे. याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करायची प्रक्रिया सुरू होती. हा सापळा उपाधीक्षक योगेश ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वी केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.