Contact Banner

मुक्ताईनगरला २० टेबलवर करण्यात येणार मतमोजणी

 

मुक्ताईनगरला २० टेबलवर करण्यात येणार मतमोजणी

मुक्ताईनगरला २० टेबलवर करण्यात येणार मतमोजणी

लेवाजगत न्यूज प्रतिनिधी मुक्ताईनगर-विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी मुक्ताईनगर येथील एस.एम. कॉलेज इंडोर स्टेडियम, बॅडमिंटन हॉलमध्ये तयारी पूर्ण झाली आहे. ईव्हीएममधील मतमोजणीसाठी १४ तर पोस्टल मतमोजणीसाठी ६ टेबल असे एकूण २० टेबल लावले असून त्यासाठी ६० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एस.एम.कॉलेज इंडोर स्टेडियममध्ये सकाळी ८ ते ८.३० दरम्यान पोस्टल मतमोजणी होईल. तर ८.३० वाजेनंतर ईव्हीएममधील मतमोजणी सुरू होणार आहे. ईव्हीएमसाठी १४ टेबल तर पोस्टल मतमोजणीसाठी ६ टेबल असे २० टेबल लावले आहे. प्रत्येक टेबलवर तीन कर्मचाऱ्यांप्रमाणे ६० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण २३ फेऱ्यांमध्येनिकाल होणार आहे. तेथे मीडिया कक्ष, व्यवस्थापन कक्ष व मेडिकल कक्ष अशा तीन कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात प्रत्येक फेरीच्या आकडेवारीची माहिती मीडिया कक्षाद्वारे दिली जाणार आहे.

     वाहतुकीत बदल 

     मतमोजणीसाठी शहरात कोंडी होणार असल्याने मुक्ताईनगर शहरातील मार्ग अवजड वाहनांसाठी बंद केला आहे. शिवाय पूर्णाडकडून मुक्ताईनगरकडे येणारा रस्ता अवजड वाहनांसाठी बंद केला आहे. मुक्ताईनगरातील वाहतूक जुने गाव, जे.ई. स्कूल, डी. वाय.एस.पी. कार्यालय, सीड फॉर्म व स्मशानभूमी या मार्गे पूर्णाड फाट्याकडे वळवण्यात आली आहे. तर बोदवड चौफुलीपासून मुक्ताईनगर शहरात येणारा रस्ता बंद करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.