Contact Banner

आम्ही सावदेकर यांचे पुणे येथे स्नेहसंमेलन,सहभागी होण्याचे आवाहन

आम्ही सावदेकर यांचे पुणे येथे स्नेहसंमेलन,सहभागी होण्याचे आवाहन


आम्ही सावदेकर यांचे पुणे येथे स्नेहसंमेलन,सहभागी होण्याचे आवाहन

लेवा जगत न्यूज पुणे- नुकतीच २४नोव्हेंबर २०२४ रोजी  सावदेकर संघाची मीटिंग घेण्यात आली, बैठकीला योगेश वायकोळे, स्वप्निल सरोदे, तुषार जंगले,कुशल नेमाडे,अशोक भंगाळे,धनंजय राणे,गोपाळ भंगाळे,नितीन भारंबे, वसंत  बेंडाळे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमा बाबत आढावा घेण्यात आला,कार्यक्रम विषयी नियोजन व चर्चा करण्यात आली.

    सावदा शहरातील पुणे , पिंपरी चिंचवड या परिसरात रहिवासी असलेले कुटुंब व माहेर असलेले कुटुंब यांचे गेट-टुगेदर(स्नेहसंमेलन) दिनांक ०८ डिसेंबर रोज रविवार या दिवशी  घेण्याचे नियोजित करण्यात आले आहे. तरी पुणे येथे नोकरी ,व्यवसाय व शिक्षण यानिमित्त स्थायिक व राहणाऱ्या सर्व कुटुंबांना या प्रसिद्धी पत्रकार द्वारे कळविण्यात येते की आपण एकत्र येऊन एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होता यावे एकतेची भावना निर्माण होऊन आपला आत्मविश्वास बळकट व्ह्यवा व आपल्या गावातील लोकांचा आपल्याला नैतिक पाठिम्बा आहे ही जाणीव व्हावी, यासाठी सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.आपल्या सावदा येथिल पुणे पिंपरी चिंचवड येथे रहिवाशी मित्रांना ,नातेवाईकांना य स्नेहसंमेलनात सहभागी करून घ्यावे असे आवाहन संघातर्फे करण्यात आले आहे.

  सावदा परिसराततील सर्व कुटुंबांची ओळख व्हावी या अनुषंगाने या गेट-टुगेदरचे(स्नेहसंमेलन) आयोजन करण्यात आले आहे. तरी  सर्व पुणे येथील सावदेकर कुटुंबांनी ए एस एम चे आई बी एम आर व्यवसाय व्यवस्थापन आणि संशोधन संस्था , महाविद्यालय , इंदिरा नगर ब्लॉक सी एम आय दि सी ,चिंचवड,पिंपरी-चिंचवड जूना मुंबई पुणे हाईवे ला लागुन या  ठिकाणी आयोजीत केलेले आहे.

   तरी खालील  दिलेला गुगल फॉर्म भरून आपले रजिस्ट्रेशन करून घेणे व स्नेहसंमेलनास उपस्थित रहावे.


https://forms.gle/Vxp9HcpCipQVhjkU9


स्नेहसंमेलन वेळेवर सकाळी १० वाजता सुरू होईल व २ वाजे पर्यंत चालेल, स्नेहसंमेलन मध्ये गाणे,नृत्य, संगीत खुर्ची,या सारखे मजेदार कार्यक्रम लहान मोठ्यासाठी आयोजित केले आहे. विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम व चर्चा लहान मुलांसाठी खेळ असे मनोरंजन  व सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येईल.    

    कार्यक्रमानंतर खान्देशी  मेनू वरणबट्टी, वांग्याची भाजी,आमसूलची कढी या जेवणाचा आस्वाद असेल..


स्नेहसंमेलनाबाबत अधीक माहीती साठी

खालील क्रमांकाला फ़ोन करून अतिरिक्त माहिती मिळवू शकता.

धनंजय राणे:-9960944857,जागृती वायकोळे :- 98500 35817

  तरी सावदेकर संघाच्या वतीने आयोजित स्नेहसंमेलनात आपण बहुसंख्य पुणे पिंपळे पिंपरी चिंचवड येथील रहिवासी असलेल्यांनी गुगल फॉर्म भरून कार्यक्रमास उपस्थिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.