Contact Banner

न्यू इंडिया एश्योरन्स कंपनीत ‘असिस्टंट’ची ५०० रिक्त पदे

 

500 Assistant Vacancies in New India Assurance Company


न्यू इंडिया एश्योरन्स कंपनीत ‘असिस्टंट’ची ५०० रिक्त पदे


न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) (भारत सरकारचा उपक्रम), मुंबई. ५०० असिस्टंट (क्लास III कॅडर) पदांची भरती. (Ref. No. CORP. HRM/ Asstt/२०२४ १६.१२.२०२४)


पदाचे नाव - असिस्टंट (क्लास III कॅडर). एकूण रिक्त पदे - ५०० (अजा - ९१, अज - ५१, इमाव - ४८, ईडब्ल्यूएस - ५०, खुला - २६०)


राज्यनिहाय रिक्त पदांचा तपशिल (कंसात स्थानिय भाषा दिलेली आहे.) - महाराष्ट्र (मराठी) - १०५ पदे (अजा - २३, अज - ८, इमाव - १, ईडब्ल्यूएस- ११, खुला - ६२) (५ पदे दिव्यांगसाठी राखीव) (कॅटेगरी VI - २, HI - १, OC - १, ID/ MD - १); गोवा (कोंकणी) - ८ पदे (इमाव - २, ईडब्ल्यूएस - १, खुला - ५); गुजरात (गुजराती) - ५० पदे. कर्नाटक (कन्नड) - ५० पदे; मध्य प्रदेश (हिंदी) - ४० पदे; राजस्थान - १५ पदे (हिंदी); उत्तर प्रदेश - २४ पदे (हिंदी); उत्तराखंड - ४ पदे (हिंदी) इ.


पात्रता : (दि. १ डिसेंबर २०२४ रोजी) कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण. (उमेदवार १० वी/१२ वी/पदवी स्तरावर इंग्रजी विषयात उत्तीर्ण असावा. तसेच प्रादेशिक भाषा अवगत असावी. (लिहिता, वाचता, बोलता येणे आवश्यक.))


वयोमर्यादा : (दि. १ डिसेंबर २०२४ रोजी) २१ ते ३० वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट इमाव - ३ वर्षे, अजा/अज - ५ वर्षे, दिव्यांग - १० वर्षे) (पुनर्विवाह न केलेल्या विधवा/घटस्फोटित/कायद्याने विभक्त महिला - ५ वर्षे; NIACL चे कर्मचारी - ५ वर्षे).


वेतन : बेसिक पे रु. २२,४०५/-, अंदाजे दरमहा वेतन रु. ४०,०००/-.


निवड पद्धती : टियर-१ प्रीलिमिनरी ऑनलाइन एक्झामिनेशन - ऑब्जेक्टिव्ह टाईप १०० गुणांसाठी (इंग्लिश लँग्वेज - ३० गुण, रिझनिंग अॅबिलिटी - ३५ गुण, न्यूमरिकल अॅबिलिटी - ३५ प्रश्न, प्रत्येकी वेळ २० मिनिटे, एकूण वेळ १ तास.)


टियर-२ मेन एक्झामिनेशन - ऑब्जेक्टिव्ह टेस्ट २५० गुणांसाठी आणि डिस्क्रीप्टिव्ह टेस्ट ३० गुणांसाठी.


ऑब्जेक्टिव्ह टेस्ट - २०० गुण, वेळ २ तास. (रिझनिंग - ४० प्रश्न, ५० गुण, वेळ ३० मिनिटे; इंग्लिश लँग्वेज - ४० प्रश्न, ५० गुण, वेळ ३० मिनिटे; जनरल अवेअरनेस - ४० प्रश्न, ५० गुण, वेळ १५ मिनिटे; न्यूमरिकल अॅबिलिटी - ४० प्रश्न, ५० गुण, वेळ ३० मिनिटे; कॉम्प्युटर नॉलेज - ४० प्रश्न, ५० गुण, वेळ १५ मिनिटे)


रिजनल लँग्वेज टेस्ट (डिस्क्रीप्टिव्ह टेस्ट) फक्त पात्रता स्वरूपाची असेल.


ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपरमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील.


अंतिम निवड - स्थानिय भाषेच्या पेपरमध्ये उत्तीर्ण उमेदवारांची निवड यादी वैद्याकिय तपासणीनंतर ऑनलाइन मुख्य परीक्षेतील गुणवत्तेनुसार अंतिम निवड केली जाईल.


टियर-१ - पूर्व परीक्षा केंद्र - महाराष्ट्रातील अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/नवी मुंबई/ ठाणे/ MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी.


प्री-एक्झामिनेशन ट्रेनिंग - अजा/ अज/ इमाव/ दिव्यांग उमेदवारांना प्री-एक्झामिनेशन ट्रेनिंगकरिता ऑनलाइन अर्ज करताना तशी नोंद करावी लागेल.


प्रोबेशन कालावधी ६ महिन्यांचा असेल जो आणखीन वाढविला जावू शकतो.


अर्जाचे शुल्क :- अजा/अज/दिव्यांग रु. १००/- इतर उमेदवारांना रु. ८५०/-.


ऑनलाइन अॅप्लिकेशन रजिस्ट्रेशन https:// www. newindia. co. in (Recruitment Section) या संकेतस्थळावर १ जानेवारी २०२५ पर्यंत करावे.


टियर-१ परीक्षा २७ जानेवारी २०२५ रोजी घेतली जाईल. टियर-२ मुख्य परीक्षा २ मार्च २०२५ रोजी घेतली जाईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.