आगामी १ ते २ वर्षांत शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध:- दादासाहेब भुसे
आगामी १ ते २ वर्षांत शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध:- दादासाहेब भुसे
दादासाहेब भुसे यांचे मालेगावात जोरदार स्वागत व सभेचे आयोजन
लेवाजगत न्युज मालेगाव:- राज्य मंत्रीमंडळाच्या विस्तारात कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर व काल शालेय शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर आज प्रथमच मालेगाव महानगरीत आले असता. या क्षणी मालेगाववासीयांनी जल्लोषात स्वागत केले.
याप्रसंगी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (शिवतीर्थ) येथे उपस्थित होऊन शिवरायांना पुष्पहार अर्पण करून वंदन केले, तसेच महात्मा ज्योतीबा फुले स्मारक, महात्मा गांधी स्मारक व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती स्मारक सर्व महापुरुषांना वंदन केले.
तसेच शिवसेना संपर्क कार्यालय येथे झालेल्या उत्साहपूर्ण स्वागत सांगता सभेने या आगमनाला एक नवा आयाम दिला. या प्रसंगी शालेय शिक्षणमंत्री पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची ग्वाही दिली आणि मालेगावच्या विकासासाठी आपल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला.
तसेच मालेगाव तालुक्यातील जनतेने महायुतीला दिलेल्या भरभरून पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडविण्याचा आपला दृढनिश्चय व्यक्त करत सांगितले की, आगामी १ ते २ वर्षांत शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. गरीब पालकांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यात येईल. यासाठी पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष संवाद साधून उपाययोजना केल्या जातील. तसेच शिक्षणमंत्री आता खेड्यातील शाळानां भेट देताना दिसेल व शिक्षकांनी कुठल्याही संस्थाचालकाला घाबरायचे कारण नाही असे यावेळी आवर्जून सांगितले.
यावेळी महायुतीचे पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते, महिला आघाडी, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत