Contact Banner

सावदा-पिंपरुड रस्त्यावर भीषण अपघातातील छायाचित्रकर गणेश भोई यांचाही उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू

 

Photographer Ganesh Bhoi, who was involved in a horrific accident on Savda-Pimprud road, also died during treatment.

सावदा-पिंपरुड रस्त्यावर भीषण अपघातातील छायाचित्रकर गणेश भोई यांचाही उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू

लेवाजगत न्यूज सावदा:-  जवळील आमोदा-भिकनगाव महामार्गावर शहरा जवळ भंगाळे फॉर्म हाऊस जवळ रस्त्यावर होंडा सिटी कारने झाडाला ठोस दिल्याने मोठा अपघात झाला होता.

  या भीषण अपघातात तीन तरुण जागीच ठार झाले होते, तर तिघांवर उपचार सुरु होते. त्यापैकी आज छायाचित्रकार गणेश भोई अंदाजे (वय 28) यांचाही जळगाव येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

      दोन दिवसापूर्वी रात्री बारा ते एक वाजेच्या सुमारास भुसावळ कडून येणाऱ्या (एम एच २० सी एच ८००२ ) या क्रमांकाच्या होंडा सिटी गाडीने भुसावळ-सावदा रस्त्यावरील पिंपरुड सावदा दरम्यानच्या रस्त्यावर एका लिंबाच्या झाडाला जोरदार धडक दिल्याने त्यात कारचा चक्काचूर झाला, शुभम सोनार, मुकेश रायपुरकर, जयेश भोई हे तीन जण ठार झाले होते.

    तर विजय जाधव,गणेश भोई,अक्षय उन्हाळे यांच्यावर जळगाव येथे उपचार सुरू होते.आज छायाचित्रकार गणेश भोई  यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. 

  गणेश भोई यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, पत्नी व मुलगा असा परिवार आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.