Contact Banner

अजीवली येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ तर्फे अखंड हरीनाम उत्सव, भव्य श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन

 

Ajīvalī-yēthē-śrī-santa-jñānēśvara-mā'ūlī-sēvā-maṇḍaḷa-tarphē-akhaṇḍa-harīnāma- utsava-bhavya-śrī-grantharāja-jñānēśvarī- pārāyaṇa-sōhaḷyācē-āyōjana

अजीवली येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ तर्फे अखंड हरीनाम उत्सव,भव्य श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन            

 लेवाजगत न्यूज उरण (सुनिल ठाकूर):- सालाबादा प्रमाणे यावर्षी देखील 14 व्या वर्षी अजीवली येथील मैदानावर श्री संत माऊली सेवा मंडळ अजीवली पनवेल परिसर तर्फे शनिवार दिनांक 28 /12/2024 ते 4/12/2025 या कालावधीत भव्य दिव्य अशा अखंड हरिनाम उत्सव, भव्य श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्या चे आयोजन करण्यात आले आहे.या दिवसात पहाटे 4 ते 6  काकड आरती, सकाळी 8 ते 12 ज्ञानेश्वरी पारायण.

  सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ. रात्रौ 9 ते 11 हरिकीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम पार पडणार आहेत.             यामध्ये शनिवार दिनांक 28/12/2024 सायंकाळी 4 ते 5 ह.भ.प.परशुराम म. पाटील ( बेलवली )यांचे प्रवचन तर रात्रौ 9 ते 11  ह. भ. प. विश्वनाथ महाराज वारिंगे (अंबरनाथ पालेगाव )यांचे हरिकीर्तन.रविवार दिनांक 29/12/2024 सायंकाळी 4 ते 5 हभप नंदकुमार महाराज गावंड (सांगडे )यांचे प्रवचन तर रात्रौ 9 ते 11 हभप महेश महाराज माकणी कर ( माकणी )यांचे हरिकीर्तन. सोमवार दिनांक 30/12/2024 सायंकाळी 4 ते 5 हभप भाऊ म. पाटील(पाली ) यांचे प्रवचन. रात्रौ 9 ते 11 हभप सुदाम महाराज पानेगावकर ( बीड )यांचे हरिकीर्तन. मंगळवार दिनांक 31/12/2024 सायंकाळी 4 ते 5 हभप निवृत्ती महाराज मुंढे (रिस )यांचे प्रवचन. रात्रौ 9 ते 11 हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरी )यांचे हरिकीर्तन.बुधवार दिनांक 1/1/2025 सायंकाळी 4 ते 5 हभप जनार्दन महाराज पाटील ( आष्टे )यांचे प्रवचन. रात्रौ 9 ते 11 हभप कृष्णा महाराज चवरे (पंढरपूर )यांचे हरिकीर्तन. गुरुवार दिनांक 2/1/2025 रोजी सायंकाळी 4 ते 5 हभप सुभाष महाराज पाटील (बेलवली ), यांचे प्रवचन. रात्रौ 9 ते 11 हभप पंकज महाराज गावडे (पुणे )यांचे हरिकीर्तन. शुक्रवार दिनांक 3/1/2025 सायंकाळी 4 वाजता दिंडी सोहळा सायंकाळी 6 वाजता दीपोत्सवकार्यक्रम पार पडणार आहे. तर रात्रौ 9 ते 11 हभप उद्धव महाराज चोले(बीड ) यांचे हरिकीर्तन.शनिवार दिनांक सकाळी 10 ते 12 हभप बाळासाहेब महाराज रंजाळे (नेवासे ), यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी सर्वांनी या सोहळ्यास उपस्थित राहून दर्शनाचा व कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंडळ अजीवली तर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.