प्रेरणादायी कविता!! -देवेंश्री सराफ फैजपूर
प्रेरणादायी कविता!!
-देवेंश्री सराफ फैजपूर
देव कधीच कुणाचे नशीब लिहीत नाही… आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब लिहितात….
!!!चालणारे दोन पाय किती विसंगत
एक मागे असतो एक पुढे असतो
पुढच्याला अभिमान नसतो
मागच्याला अपमान नसतो
कारण त्यांना माहीत असतं
क्षणात सारं बदलणार असतं
याचच नाव जीवन असतं
याचच नाव जीवन असतं…संधी मिळेल तुलाही
लगेच हिरमसु नकोस,
आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त तू खचू नकोस,
प्रेम तुझ्यावर करणारे
कितीतरी लोक आहेत,
तुझ्यासाठी जोडणारे
खूप सारे हात आहेत,
असे अशा आपल्यांसाठी
तू ही थोडं हसून बघ,
आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त तू खचू नकोस…काळ हा कोणाचाच नसतो
का रे तू समजक नाहीस,
आज तू हरला म्हणून
असं नाही की तू उद्या जिंकणार नाहीस,
काळ तर कोणाच्याच हातात नाही
तो नेहमी बदल असतो,
कधी आपल्याला परकं करतो
तर कधी परक्यांना आपलं करतो,
बुडलेला सूर्य पुन्हा एकदा उगवत असतो
तोही प्रत्येक दिवशी नव्याने सुरूवात करतो,
कोमेजेलेलं फुल पाहून झाड कधीच निराश होत नाही
कारण त्याला माहीत असतं उद्याचा बहर अजून येणार आहे…
तू ही कर असं काही, की लोक घेतील तुझं नाव अभिमानाने… घे आकाशात उंच भरारी नको करू पर्वा हरण्याची…जन्माला आला आहेस तर थोडं जगून बघ
जीवन खूप खडतर आहे थोडं सोसून बघ,
चिमुटभर दुःखाने कोसळून जाऊ नकोस
प्रयत्नाचा डोंगर चढून बघ, यशाची चव चाखून बघ,
अपयश आलं तर ते निरखून बघ
यश आलं तर ते थोडं वाटून बघ,
डाव मांडणं खूप सोपं आहे फक्त थोडं खेळून बघ,
स्वतःचं घरटं बांधायचं असेल तर काडी काडी जमवून बघ,
जगणं सोपं आहे की मरणं सोपं आहे थोडं तोलून मापून बघ,
जीवन एक कोडं आहे जगता जगता ते सोडवून बघलढता लढता हरलो जरी,
हरल्याची मला खंत नाही…
लढा माझा माझ्यासाठी
लढाईला माझ्या अंत नाही…
पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन
चांगल्या लोकांची परमेश्वर
खूप परिक्षा घेतो
पण साथ कधीच सोडत नाही
वाईट लोकांना परमेश्वर
खूप काही देतो
पण साथ कधीच देत नाहीकासवाच्या गतीने करा होईना
रोज थोडी थोडी प्रगती करा
खूप ससे येतील वाटेत आडवे
बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा
जर तुम्हाला श्रीमंती मोजायची असेल
तर नोटा मोजत बसू नका
कधी चुकून डोळ्यात दोन अश्रू आले
तर पुसायला किती जण येतात ते मोजासमुद्राने झऱ्याला
हिणवून विचारले,
झरा बनून किती दिवस राहणार
तुला समुद्र नाही का व्हायचे ?
त्यावर झऱ्याने शांततेत उत्तर दिले,
मोठे होऊन खारे होण्यापेक्षा
लहान राहून गोड बनणे कधीही चांगले
कारण तिथे वाघ पण वाकुन पाणी पितोपाकळ्यांचे गळणे म्हणजे फुलांचे संपणे असते
संपतानाही सुंगध देणं यातंच त्यांचे आयुष्य असते
असं आयुष्य जगता येणे म्हणजे
खरंच आयुष्याचे सोने असते
पण या ज्यांना याचा अर्थ समजतो त्यांचे जीवनच खऱ्या अर्थाने सोन्याहून पिवळे असते!!!देव कधीच कुणाचे नशीब लिहीत नाही… आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब लिहितात….
____देवेश्री सराफ___
ही बातमी बघा-सावद्याजवळ कारचा भीषण अपघात ,भुसावळ येथून हळदीचा कार्यक्रम आटोपून येणाऱ्या मित्रावर काळाचा घाला, कारचा चक्काचूर*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत