रावेर येथील तिघांचा अपघातात मृत्यू तर दोघ गंभीर जखमी,सावदा भुसावळ महामार्गावर भीषण अपघात
रावेर येथील तिघांचा अपघातात मृत्यू तर दोघ गंभीर जखमी,सावदा भुसावळ महामार्गावर भीषण अपघात
लेवाजगत न्यूज सावदा:- भुसावळ महामार्गावर रात्री दोन वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला असून, अपघातात रावेर येथील तीन मित्रांचा जागीच मृत्यू तर दोन जखमी मित्र मृत्यूची झुंज देत आहे.
भुसावळ येथील मित्राच्या बहिणीचा हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी येत असताना रात्री दोन वाजता पिंपरुड-सावदा दरम्यान ही घटना घडल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.
हा अपघात एवढा भीषण आहे की अक्षरशः चार चाकी गाडीचा चुराडा झाला आहे. मृत्यू झालेल्या तिघमित्रांची नावे अद्याप कळू शकली नाही या अपघाताची वार्ता सकाळी रावेर शहरात कानावर पडतात रावेर शहरात मात्र स्मशान शांतता पसरली असून मित्र परिवारातर्फे एकमेकांना फोन लावणे सुरू झाले आहेत. तर जखमी असलेल्या दोन मित्रांपैकी एकाची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याची माहिती आहे.
मित्राच्या बहिणीच्या हळदीवरुन जाताना अपघात
जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील पाच मित्र भुसावळ येथील एका मित्राच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमाला गेले होते. भुसावळकडून सावदा मार्गे रावेरकडे येत असताना त्यांच्या एमएच २० सीएस ८००२ गाडीने भरधाव वेगात झाडाला जोरदार टक्कर दिली. यात रावेर शहरातील शुभम सोनार (वय २५) मुकेश रायपूरकर (वर २३) सह अजून एक जण ठार झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत