सहा गाई निर्दयीपणे बांधून ठेवल्या प्रकरणी सावदा पोलीसांचा ख्वाजा नगरातील पत्री गोडाऊन वर छापा
सहा गाई निर्दयीपणे बांधून ठेवल्या प्रकरणी सावदा पोलीसांचा ख्वाजा नगरातील पत्री गोडाऊन वर छापा
लेवा जगत न्यूज सावदा:- येथील ख्वाजा नगर मधील एका पत्री शेडच्या गोडाऊनमध्ये सहा गाई निर्दयीपणे बांधून ठेवल्याचा गुन्हा सावदा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
चार जणांविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१)(च) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९ प्रमाणे पोलीस कॉन्स्टेबल मयूर पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील ख्वाजा नगर परिसरातील शेख रसुल शेख चांद कुरेशी यांच्या पत्री गोडाऊन शेड मध्ये दिनांक ३ रोजी संध्याकाळी ६ वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला.
यात १ लाख ३५ हजार किमतीच्या सहा गाई शेख रसुल शेख चांद कुरेशी, वय-४०,शेख, जग्गा शेख पिरु कुरेशी, शाहबाज जमील कुरेशी,साहील जमील कुरेशी सर्व रा. ख्वाजानगर सावदा ता. रावेर आरोपी याने त्याचे ताब्यातील गोडावुन मध्ये वरील वर्णनाचे व किंमतीच्या एकुण ६ गायी या दोरीने गळा व पाय बाधलेल्या स्थितीत, त्यांना हालचाल करणे शक्य होणार नाही,
अशा स्थितीत व त्यांना चारा पाण्याची व्यवस्था न करता त्यांची कोणतीही काळजी न घेता निर्दयतेने बांधुन ठेवले अशा तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांचे मार्गदर्शनखाली गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश अशोक पाटील करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत