Contact Banner

विद्यार्थी गाढ झोपेत एसटी बसचा ताबा सुटल्याने भीषण अपघात


  विद्यार्थी गाढ झोपेत 
एसटी बसचा ताबा सुटल्याने भीषण अपघात


लेवाजगत न्युज सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात घडला आहे. सिंधुदुर्गातील नांदगाव-ओटव फाटा येथे अपघात झाला आहे. एसटी बस ही पुणे ते सिंधुदुर्ग अशी विद्यार्थ्यांची सहल घेऊन निघाली होती. मात्र बस वरील ताबा सुटल्याने एसटी बस ही संरक्षण कटार्‍याला आढळून भीषण अपघात घडला आहे.हा अपघात मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घटना घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पुलावरील संरक्षक कठड्याला आदळली. सुदैवाने बसमधील विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या. या अपघाताची माहिती करता स्थानिक आणि घटनास्थळी धाव घेतली असून या ठिकाणी नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांच्यासह भुपेश मोरजकर, केदार खोत, प्रभाकर म्हसकर, दिक्षा मोरजकर आदींनी तातडीने मदतकार्य केले. तसेच त्यांना तात्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ते सिंधुदुर्ग अशी विद्यार्थ्यांना घेऊन ही बस सिंधुदुर्गातील प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी निघाली होती ही बस विद्यार्थ्यांना घेऊन मालवणच्या दिशेने जात असताना हा अपघात घडल्याची माहिती स्थानिकांकडून समोर येत आहे.मध्यरात्री दोनच्या सुमारास चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस नांदगाव-ओटव बॉक्सवेलवरील संरक्षक कठड्याला आदळली. सुदैवाने बसचा वेग कमी असल्याने मोठा अपघात टळला. सर्व विद्यार्थी गाढ झोपेत होते. यातील काही जणांना किरकोळ दुखापती झाल्या. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार चालकाला मध्यरात्री अचानक झोप लागल्यामुळे त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटल्याचं म्हटलं जात आहे.तसेच वेगावर नियंत्रण असल्यामुळे फार मोठा अपघात घडला नाही.


एसटी बस ही संरक्षण कठड्याला धडकताच मोठा आवाज आला.त्यामुळे स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतलीय. एसटीचा अपघात घडल्यामुळे विद्यार्थीही घाबरून गेले होते त्यामुळे घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी आरडाओरड केला.तसेच तातडीने १०८ रूग्णवाहिका मागवून जखमींना कणकवली उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. मात्र या घडलेल्या अपघाताची माहिती स्थानिक पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली आहे हवालदार चंद्रकांत झोरे, श्री माने, तसेच महिला कॉन्स्टेबल प्रणाली जाधव हे घटनास्थळी दाखल झाले होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.