रेल्वे अपघातात नेपाळी कुटुंबातील ४जण ठार: आजीने अपघातापूर्वी नातवाला व्हिडिओ कॉल केला,आता नातू आजीला केव्हाच भेटणार नाही
रेल्वे अपघातात नेपाळी कुटुंबातील ४जण ठार: आजीने अपघातापूर्वी नातवाला व्हिडिओ कॉल केला,आता नातू आजीला केव्हाच भेटणार नाही
लेवाजगत न्यूज जळगाव-जिल्ह्यातील विचित्र रेल्वे अपघातात नेपाळच्या २ नातेवाईक कुटुंबातील ४ जणांचा बळी गेल्याची बाब आता समोर आली आहे. पीडित कुटुंब हे नेपाळचे होते. ते भिवंडीत वास्तव्यास असणाऱ्या आपल्या मुलाच्या भेटीसाठी येत होते. पण तत्पूर्वीच त्यांच्या कुटुंबातील ४ सदस्यांवर काळाने घाला घातला. दरम्यान, या दुर्घटनेत १३ जणांचा बळी गेला असून, अनेकजण जखमी झालेत.
जळगाव जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी पाचोरा स्थानकाजवळपरसाडे गाव जवळ लखनऊहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली. या अफवेमुळे घाबरून काही प्रवाशांनी चेन पुलिंग करून ट्रेन थांबवली. यावेळी रेल्वेतून उतरणारे प्रवाशी दुसऱ्या ट्रॅकवरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसच्या खाली सापडले. या भीषण दुर्घटनेत भिवंडीतील जयगडी व पुण्यातील विश्वकर्मा कुटुंबीयांवर शोककळा पसरली. या दोन्ही कुटुंबातील ९ सदस्य पुष्पक एक्सप्रेसने नेपाळवरून लखनऊ मार्गे भिवंडीकडे येत होते. मात्र, रस्त्यात झालेल्या अपघातामुळे या कुटुंबातील ४ सदस्यांचा जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण दोन्ही कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जयकला जयगडी (६०) या नेपाळच्या चाल्स गावच्या रहिवासी होत्या. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्याचा नातू भारतात आला होत. तो प्रथम पुण्यात व तेथून भिवंडीला गेला होता. तिथे तो सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. जयकला या त्यांच्या भेटीसाठी मुंबईला येत होत्या. तिथे त्यांच्यावर दमा व हृदयविकारावर उपचारही करण्यात येत होते. रस्त्यात त्यांनी आपल्या नातवांना फोन लावला. त्यांना लवकरच येत असल्याचे सांगितले. जवळपास १० वर्षांनंतर त्या आपल्या नातवांशी भेटणार होत्या. पण रस्त्यातच त्यांच्यावर काळाने झडप घातली आणि त्या आपल्या कुटुंबापासून हिरावल्या गेल्या.
दुसरीकडे, या कुटुंबासोबत नेपाळच्या कुच्ची कलिकास्थान येथील विश्वकर्मा कुटुंब पुण्यातील इंद्रायणी नगर सद्गगुरू कंपनीत नोकरीस होते. या कुटुंबातील नन्ना विश्वकर्ना (५५), त्यांच्या पत्नी मेश्रा विश्वकर्मा (४५), मुलगा हेमंत विश्वकर्मा (११) व यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मेश्रा यांना मुतखडा चा आजार होता. त्यांनाही उपचारासाठी पुण्यात आणले जात होते.
या दोन्ही कुटुंबातील एकूण ९ सदस्य लखनऊहून निघाले होते. पण जयगडी कुटुंबातील १, तर विश्वकर्मा कुटुंबातील ३ असे ४ जण या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले. जयगडी व विश्वकर्ना हे एकमेकांचे नातेवाईक होते. ते प्रथम भिवंडीत येणार होते व तेथून पुण्याला जाणार होते. त्यासाठी सर्व नातवंडे एकेठिकाणी जमा झाले होते. ते आपल्या आजीची वाट पाहत होते. पण आता आजीच्या मृत्युची बातमीच धडकल्यामुळे त्यांची भेट तशीच राहिली आहे.आजीने अपघातापूर्वी नातवाला व्हिडिओ कॉल केला, आता नातू आजीला केव्हाच भेटणार नाही

कोणत्याही टिप्पण्या नाहीत