Header Ads

Header ADS

ज्येष्ठ अभिनेते टीकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृती चिंताजनक


 ज्येष्ठ अभिनेते टीकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृती चिंताजनक


लेवाजगत न्युज मुंबई:-बॉलिवूड इंडस्ट्रीतले लोकप्रिय अभिनेते टीकू तलसानिया यांच्या प्रकृती गंभीर असल्याचं समोर आलं आहे. हार्ट अटॅक आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती आहे.


टीकू तलसानिया यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहेत. सध्या त्यांची प्रकृती नाजूक असल्याचं म्हटलं जात आहे.


सिने इंडस्ट्रीतल्या ज्येष्ठ कलाकरांपैकी ते एक आहेत. ७० वर्षीय टीकू तलसानिया यांच्या तब्येतीसाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत.


९० च्या चित्रपटातला लोकप्रिय चेहरा

९० च्या दशकात बॉलिवूड चित्रपटांमध्ये हमखास दिसणाऱ्या कलाकारांमध्ये त्यांचं नाव घ्यावं लागेल. त्यांच्या विनोदी भूमिका इतक्या गाजल्या की, प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक त्यांचा चाहता आहे. त्यांचं विनोदाचं टायमिंग , त्यांचा अभिनय याचं नेहमीच कौतुक झालं आहे. टिकू यांनी 'दिल है की मानता नहीं', 'कभी हान कभी ना', 'इश्क', 'अंदाज अपना अपना', 'कुली नं. १' 'हंगामा' यांसारख्या बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट आणि धमाल कॉमेडी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.


२०० हून अधिक सिनेमांत केलंय काम

टिकू यांनी बॉलिवूडच्या तब्बल २०० हून अधिक चित्रपटात काम केलंय. त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका प्रेक्षकांना नेहमीच आवडल्या. त्यातही त्यांची विनोदी पोलिसाची भूमिका प्रेक्षकांना जास्त आवडली.


काम मिळत नसल्याची खंत

तर गेल्या काही वर्षात त्यांना काम मिळत नसल्याची खंत टिकू यांनी व्यक्त केली होती. बॉलिवूडचा एक काळ जागवणाऱ्या या ज्येष्ठ अभिनेत्याकडे काम नसल्याचं समोर आल्यानंतर चर्चा झाली होती. इतक्या वर्षांचा अनुभव असतानाही टिकू ऑडिशन देत असतात. पण त्यांच्या वाट्याला नकार जास्त येत असल्याचं त्यांनी काही महिन्यांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.


तर गुजराती सिनेइंडस्ट्रीत सक्रियबॉलिवूडमध्ये काम मिळत नसलं तरी टिकू हे गुजराती रंगभूमी आणि सिनेसृष्टीक सक्रिय असतात. टिकू यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात ही गुजराती नाटकांमधूनच केली . सध्या असं आहे की, मला समोरून ज्या कामासाठी विचारलं जातंय, त्या कामासाठी मी होकार देतोय. पण म्हणावं तसं काम माझ्याकडे नाहीये, काम शोधणंही आजकाल कठीण झाल्याचंही त्यांनी मुलाखतीत म्हटलं होतं.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.