Header Ads

Header ADS

'स्रीची समाजात कींमत व्हावी'-शास्री भक्ती प्रकाशदासजी

 

Women-should-be-valued-in-society- Shastri-Bhakti- Prakashdasji

'स्रीची समाजात कींमत व्हावी'-शास्री भक्ती प्रकाशदासजी

लेवाजगत न्यूज फैजपूर - 'पालक मुलांना वेळेवर लग्न करायला  प्रवृत्त करीत नाही परिणामी मुलांची लग्न ३२ /३३व्या वर्षी होत असल्याने समाजाची घडी विस्कळीत होत आहे. समाजात घटस्फोटाचे प्रमाण वाढलेले आहे. समाजात मुले व मुली यांच्या संख्येत विषमता आहे. गरीब कुटुंबातील मुले व मुली त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत. समाजातील सक्षम कुटुंबांनी अशा मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेणे गरजेचे आहे. अशा कुटुंबातील मुलांच्या विवाह प्रसंगी सक्षम कुटुंबांनी आर्थिक मदत करणे गरजेचे वाटते. विवाह सोहळ्यात अहंकार बडे जावं दिसून येतो तो कमी ह्वावा, स्त्रीला समान अधिकार आहेत. स्त्रीत्व व पुरुषत्व या दोघांनमध्ये खूप फरक आहे. स्त्री नारायणी आहे. मुलांचे संगोपन स्त्री सारखे पुरुष करू शकत नाही.असे उद्गार शास्त्री भक्तीप्रकाश दासजी यांनी समाजापुढील समस्या व त्या निराकरण करण्यासाठी काढले .लेवा पाटीदार महासंघाच्या वतीने निवडक समाज कार्यकर्ते आणि समाजातील संत गण यांच्या उपस्थितीत ही सभा जळगाव येथे आयोजित करण्यात आली होती .या सभेसाठी शास्त्री भक्तीप्रकाश दासजी,ह .भ. प. भरत महाराज बेळीकर या संत गणांसह अरुण बोरोले, दिलीप कापसे, निळकंठ चौधरी ,एम. एन .पाटील, महेश बोरोले, प्रमोद महाजन ,पुरुषोत्तम पिंपळे, ज्ञानेश्वर पाटील, प्रकाश वराडे, सीमा गाजरे ,उपस्थित होते .या सभेचा उद्देश समाजापुढील समस्या व त्यावर चिंतन, चर्चा व उपाय करणे हा होता. याप्रसंगी विविध मान्यवरांनी उपरोक्त विषयांवर मार्गदर्शन व सूचना केल्या .प्रमोद महाजन यांनी लग्न प्रसंगांच्या जेवणावळी, व्यसनमुक्ती यावर मार्गदर्शन केले तर ज्ञानेश्वर पाटील यांनी समाजातील प्रगतीसाठी धार्मिक धर्मगुरूंची व्यवस्था प्रतिपादन केली. निळकंठ चौधरी यांनी आठवड्यातून एक दिवस समाज बांधवाने मंदिरात जाण्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमात असंख्य समाज बांधव उपस्थित होते.अशा कार्यक्रमांमुळे समाजाची उन्नती होईल असा विश्वास उपस्थितानी त्यांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.