Header Ads

Header ADS

भुसावळ येथिल श्री.र.न.मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिर येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

 

Bhusawal-Yethil-Shri-R.N.Mehta-Hindi-Primary-Vidyamandir-Annual-Friendly-Meeting-At-Here-in-Excitement

 भुसावळ येथिल श्री.र.न.मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिर येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

लेवाजगत न्यूज भुसावळ-येथिल श्री.र.न.मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिर येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी सेवा मंडळ च्या महामंत्री श्रीमती मधूलताजी शर्मा या होत्या. व्यासपीठावर मधुलताजी शर्मा ,प्रधानाध्यापिका सौ रीता शर्मा,पालक प्रतिनिधी- यास्मिन मोहम्मद नौशाद,प्रीती फर्नांडिस,सौ नॅन्सी मिसाळ,श्री सुमित पाटील,श्री रवींद्र पाटील,श्री हेमंत धांडे,श्री चेतन  शर्मा उपस्थित होते. 

कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून झाली.  विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत यांचे गायन  केले.विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर नृत्य सादर केले तसेच शास्त्रीय नृत्य, लावणी, रिमिक्स, नाटिका, एकल नृत्य , गीत गायन यांचा समावेश सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये होता.

     सांस्कृतिक ,सामाजिक, धार्मिक ,शैक्षणिक संदेश या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांतून  दिला तसेच सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्कृष्ट सादरीकरण केले. संपूर्ण विद्यालयाचे उत्कृष्ट आयोजनाबद्दल मी कौतुक करते, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्षा श्रीमती मधुलताजी शर्मा यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती वैशाली चौधरी तसेच आभार प्रदर्शन श्री उमेश खोडपे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रधानाध्यापिका सौ रीता शर्मा मॅडम तसेच शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमासाठी प्रसार माध्यम प्रतिनिधींचे  सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.