धनाजी नाना महाविद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सवाला उत्साहात सुरुवात
धनाजी नाना महाविद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सवाला उत्साहात सुरुवात
लेवाजगत न्यूज फैजपूर-येथील धनाजी नाना महाविद्यालयात दर वर्षी प्रमाणे या वर्षी पण वार्षिक क्रीडा महोत्सवास अतिशय उत्साहात सुरुवात झाली. धनाजी नाना महाविद्यालयाचे विद्यार्थी (पुरुष व महिला), शिक्षक (पुरुष व महिला) आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्ये क्रिकेट, बुद्धिबळ, टेबल टेनिस, बॅडमिंटन, भारतोलन, शक्तीतोलन, धनुर्विद्या आणि मैदानी स्पर्धा यांचे सामने आज पासून अतिशय उत्साहात सुरुवात झाली. उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे क्रीडा प्रेमी प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे व प्रमुख उपस्थितीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्रा. डॉ. पदमाकर पाटील, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. जाधव, जिमखाना समिती चेअरमन डॉ. ए. के. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे परिवेक्षक प्रा. उत्पल चौधरी, स्नेह संमेलन चेअरमन डॉ. आय. पी. ठाकूर आणि महाविद्यालयातील विद्यार्थी (पुरुष व महिला), शिक्षक (पुरुष व महिला) आणि शिक्षकेत्तर कर्मचारी इत्यादी उपस्थित होते. उदघाटन समारंभाचे प्रास्ताविक जिमखाना समितीचे चेअरमन डॉ. ए. के. पाटील यांनी केले व सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गोविंद मारतळे यांनी केले आणि आभार प्रा. शिवाजी मगर यांनी मानले.
क्रिकेट मध्ये एकूण आठ संघानी सहभाग घेतला, बुद्धिबळ स्पर्धेत पाच पुरुष व चार महिला संघानी सहभाग घेतला, टेबल टेनिस मध्ये एकूण आठ पुरुष व चार महिला संघानी सहभाग घेतला, बॅडमिंटन मध्ये एकूण आठ पुरुष व सहा महिला संघानी सहभाग घेतला, भारतोलन मध्ये एकूण १६ पुरुष व १२ महिला खेळाडूंनी सहभाग घेतला, शक्तीतोलन मध्ये एकूण १६ पुरुष व १२ महिला खेळाडूंनी सहभाग घेतला, धनुर्विद्या मध्ये एकूण १० पुरुष व ०८ महिला खेळाडूंनी सहभाग घेतला आणि मैदानी स्पर्धा मध्ये एकूण ४८ पुरुष व २१ महिला खेळाडूंनी सहभाग घेतला सदरील स्पर्धेतून विजयी खेळाडूंना बक्षीस प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानी बोलतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी सर्व खेळाडूंना निरोगी राहण्यासाठी खेळाचे महत्व आणि रोजगाराची संधी म्हणून खेळाकडे पाहावे आणि त्याचा नियमित सराव करावा असे सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी स्पर्धेचे उदघाटन झाले असे जाहीर करून सर्व सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तर प्रास्ताविकात डॉ. अनिल पाटील यांनी क्रीडा महोत्सव स्पर्धा भरविण्यामागचा उद्देश काय आहे आणि चांगल्या खेळाडूंनचा शोध घेणे व ज्या विद्यार्थ्यांना आंतर महाविद्यालयीन किंवा विभागीय स्पर्धेत खेळात आले नाही त्यांना उत्तम संधी असल्याचे सांगितले व ज्यास्तीत ज्यास्त विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे असे सुचविले.
स्पर्धा यशस्वी संपन्न करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे सर मार्गदर्श करत आहेत, डॉ. पी. दि. पाटील, डॉ. ए. के. पाटील, डॉ. आय. पी. ठाकूर, डॉ. सविता वाघमारे, प्रा. उत्पल चौधरी मार्गदर्शन करीत आहेत तर शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गोविंद मारतळे, प्रा. शिवाजी मगर, प्रा. दिलीप बोदडे, प्रा. अर्चना वराडे, प्रा. रमेश वाघ, प्रा. सुरेश वनघरे, प्रा. पूनम कोल्हेआणि श्री. आर. डी. ठाकूर, शेखर महाजन, धनराज माळी, श्रीराम कोळी, सचिन भोई, ओंकार रितापुरे, चेतन, अंकुश, समी, कल्पेश इत्यादी परिश्रम घेत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत