Header Ads

Header ADS

बॉबी देओलने केले पनवेलच्या कल्याण ज्वेलर्सचे उद्घाटन पनवेल येथील कल्याण ज्वेलर्सचे महाराष्ट्रात २१ आउटलेट

 बॉबी देओलने केले पनवेलच्या कल्याण ज्वेलर्सचे उद्घाटन

पनवेल येथील कल्याण ज्वेलर्सचे महाराष्ट्रात २१ आउटलेट 

Bobby Deol inaugurates Kalyan Jewellers in Panvel Kalyan Jewellers in Panvel has 21 outlets in Maharashtra


उरण सुनिल ठाकूर- कल्याण ज्वेलर्स या अग्रगण्य आणि सर्वात विश्वासार्ह ज्वेलरी ब्रँडने आज पनवेलमध्ये आपल्या नवीन शोरूम्सची घोषणा केली. बॉलीवूड स्टार बॉबी देओल १२ जानेवारी (रविवार) संध्याकाळी ६:०० वाजता या नवीन शोरूमचे उद्घाटन करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, पनवेल येथील हे नवीन आउटलेट कल्याण ज्वेलर्सचे महाराष्ट्रातील २१ वे शोरूम आहे. उत्कृष्ट दागिन्यांच्या कलेक्शनपासून विस्तृत डिझाईन्स येथे उपलब्ध आहेत.


श्री.रमेश कल्याणरामन, कार्यकारी संचालक, कल्याण ज्वेलर्स म्हणाले,“आमच्या आजवरच्या प्रवासात आम्ही उल्लेखनीय टप्पे गाठले आहेत आणि ग्राहकांचा अनुभव वाढविण्यासाठी एक मजबूत इकोसिस्टम तयार करण्यात महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. कल्याण ज्वेलर्ससाठी महाराष्ट्र ही एक महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही या प्रदेशात धोरणात्मकरित्या विस्तार केला आहे. आम्हाला विश्वास आहे की, पनवेलमधील आगामी शोरूम आमच्या मूल्यवान ग्राहकांना अधिक सोयी आणि सुलभता प्रदान करताना आमच्या बाजारपेठेतील उपस्थिती आणखी मजबूत करेल.”


या नवीन शोरूमचे उद्घाटन करताना कल्याण ज्वेलर्सने अनेक आकर्षक ऑफर जाहीर केल्या आहेत, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या दागिन्यांच्या खरेदीवर चांगल्या बचतीचा आनंद घेण्याची संधी मिळते. लॉन्च ऑफरचा एक भाग म्हणून, ग्राहकांना साध्या सोन्याचे दागिने आणि डायमंड जडलेल्या दागिन्यांच्या घडणावळीवर भरघोस सूट मिळू शकेल याशिवाय, कल्याण स्पेशल गोल्ड बोर्ड रेट - बाजारातील सर्वात कमी आणि सर्व कंपनीच्या शोरूममध्ये प्रमाणित - देखील लागू होईल.


शोरूम मध्ये कल्याणच्या लोकप्रिय हाऊस ब्रँड्सचा-मुहूर्त (वेडिंग ज्वेलरी लाइन), मुद्रा (हँडक्राफ्टेड अँटिक ज्वेलरी), निमाह (टेम्पल ज्वेलरी), ग्लो (डान्सिंग डायमंड्स), झिया (सॉलिटेअर सारखी डायमंड ज्वेलरी), अनोखी (अनकट डायमंड्स) यासह अपूर्वा (खास प्रसंगासाठीचे हिरे), अंतरा (लग्नाचे हिरे), हेरा (डेली वेअर डायमंड्स), रंग (मौल्यवान स्टोन्स ज्वेलरी), आणि नुकत्याच लाँच झालेल्या लीला (रंगीत स्टोन्स आणि डायमंड ज्वेलरी), यांचाही समावेश असेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.