Header Ads

Header ADS

रावेर येथील अवैध गौणखनिज वाहतुक करीत असतांना जप्त केलेल्या वाहनांची लिलावाव्दारे होणार विक्री

Vehicles seized while transporting illegal minor minerals in Raver will be sold through auction



रावेर येथील अवैध गौणखनिज वाहतुक करीत असतांना जप्त केलेल्या वाहनांची लिलावाव्दारे होणार विक्री

लेवाजगत न्यूज  रावेर -तालुक्यातील अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुक करणारे वाहन तहसिल कार्यालयातील बैठे पथक व भरारी पथकांनी जप्त केले होते. अवैधरित्या गौणखनिजांचे उत्खनन करुन वाहतुक करीत असतांना जप्त केलेल्या वाहन मालकांविरुध्द दंडात्मक कार्यवाहीचे आदेश पारीत करण्यात आलेले आहेत. वाहन मालक यांनी दंडात्मक कार्यवाहीतील आदेशातील रक्कम शासन जमा केलेली नसल्याने या वाहनांचा लीलाव करण्यात येणार आहे. 

त्या अनुषंगाने या वाहनांचा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जळगांव यांच्या कडुन मुल्यांकन काढुन दि. 16 जानेवारी 2025 रोजी तहसिल कार्यालय रावेर येथे सकाळी 11.00 वाजता जाहिर लिलाव ठेवण्यात आला आहे. 

             या लिलावात योगेश चांभार, संतोष सुरा पवार, केशरलाल पाटील, निलेश नवसिंग जाधव, विलास शतराज तायडे, ललित महाजन, सुभाष चव्हाण, मनोज तुकाराम कोळी, विलास शतराज तायडे, अरुन सुभाष वानखेडे , राज निरबा भिल, विनोद धुमसिंग चव्हाण, तुकाराम सिताराम कोळी  यांच्या ट्रॅक्टरचा लिलाव करण्यात येणार आहे. अशी माहिती  रावेरचे तहसिलदार बी.ए. कापसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.