चिनावल येथिल बेकायदेशीर वृक्षतोड व विक्री-गुन्हा दाखल करा जयेश इंगळे यांची निवेदनाद्वारे मागणी
चिनावल येथिल बेकायदेशीर वृक्षतोड व विक्री-गुन्हा दाखल करा जयेश इंगळे यांची निवेदनाद्वारे मागणी
लेवाजगत न्यूज चिनावल-गावा मध्ये असलेले प्लॉटचे ओपन स्पेस, अंगणवाडी व गावातील काही लोकांच्या प्लॉट मध्ये नैसर्गिक रित्या पडलेले झाडे कोणी तोडले व ते विक्री सुद्धा केले ही बाब गावचे नागरिक जयेश इंगळे यांच्या लक्षात आल्या नंतर त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात आपण झाडे तोडण्याची व विक्री करण्याची परवानगी घेतली आहे का ?असा माहिती अधिकार अर्ज टाकला असता या वर उत्तर म्हणून ग्रामसेवक श्री कैलाश भगत यांनी एक पत्र दिले त्या मध्ये ते म्हटले की,ग्रामपंचायत कडून कोणत्याही प्रकारचे झाडे तोडली नाही व त्याचा लिलाव सुद्धा केला नाही .
मग नेमके झाडी तोडली कोणी व ती विक्री करून पैसे कोणाच्या घशा मध्ये गेले या साठी श्री जयेश इंगळे यांनी वनविभाग अधिकारी श्री अजय बावणे यांच्या कडे अर्ज करत दोषींवर तत्काळ गून्हा दाखल करावा अशी मागणी केली सोबत नायब तहसीलदार श्री संजय तायडे , गटविकास अधिकारी यांची सुद्धा भेट घेऊन दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली .निवेदन देते वेळी गावचे माजी उपसरपंच परेश महाजन सोबत होते


कोणत्याही टिप्पण्या नाहीत