Contact Banner

सावदा येथिल पालिका संचालित हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले विविध गुण दर्शनाचे सादरीकरण

Students of Savada-Yethil-Municipality-run-High-School-Junior-College-presented-various-qualities-of-philosophy


 सावदा येथिल पालिका संचालित  हायस्कूल  कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले विविध गुण दर्शनाचे सादरीकरण

लेवाजगत न्यूज सावदा -येथील नगर पालिका संचालित श्री आ. गं हायस्कूल व ना गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी आणि विदयार्थीनी यांच्या विविध गुण दर्शन कार्यक्रम आज दि. 3 जानेवारी 2025 रोजी संपन्न झाला. यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त  अभिवादन करुन मुख्याध्यापक पी. जी. भालेराव, मुख्याध्यपिका पुष्पा ठोंबरे, पर्यवेक्षक  वाय. एन पाटील,  एस एम महाजन यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. 


लेवाजगत


   या कार्यक्रमात इयत्ता 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थी, विदयार्थीनी यांनी रेकॉर्ड डान्स, नाट्यछटा असे विविध कार्यक्रम सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली. 

इयत्ता 9 वी आणि 10 वीच्या विद्यार्थी ग्रुपने सादर केलेला कॉमेडी डान्सला वन्समोअरची दाद मिळाल्याने पुन्हा सादर करण्यात आला. सर्व ग्रुपडान्सला शिक्षक आणि पालक यांनी रोख बक्षीस जाहीर केले.

कार्यक्रमासाठी उत्कृष्ट सूत्रसंचालनाची जबाबदारी 12 वी विज्ञान वर्गातील विद्यार्थीनी कु.अक्षरा काळकर आणि कु. साक्षी राजपूत यांनी पार पाडली. यांना नंदू पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.