चिनावल येथिल बेकायदेशीर वृक्ष तोड व विक्री प्रकरणीवनविभागाने केला पंचनामा व चौकशी,दोषींवर कार्यवाही करणार वनविभाग
चिनावल येथिल बेकायदेशीर वृक्ष तोड व विक्री प्रकरणीवनविभागाने केला पंचनामा व चौकशी,दोषींवर कार्यवाही करणार वनविभाग
लेवाजगत न्यूज चिनावल- येथील बेकायदेशीर वृक्ष तोड व विक्री प्रकरणी तक्रारदार जयेश इंगळे चिनावल यांनी वन विभाग सहाय्यक अजय बावणे यांच्या कडे तक्रार दिली होती. ती तक्रार लेवा जगत न्यूजच्या माध्यमातून प्रसारित झाली होती. याची दखल घेत वनविभाग अधिकारी रवींद्र सोनवणे व त्यांची टीम यांनी पंचनामा करीत गावातील ज्या भागात झाडे तोडली व छाटन केलीय त्यांचे मेजरमेंट घेऊन जिओ टॅग मध्ये फोटो काढली.
झाडे तोडणाऱ्यांचे त्यांना कोणी तोडायला सांगितले याचे जबाब घेतले. त्या मध्ये चिनावल येथील सॉमिलचे मालक मबा मण्यार,जमील मुराद तडवी,हमीद तडवी चीचाटी यांनी चिनावाल ग्रामपंचायत सरपंच व सरपंच पती, ग्रामसेवक कैलास भगत यांच्या सांगण्यावरून झाडे तोडली असा जबाब दिला. आणी दोषींना दंडात्मक व कायद्याच्या तरतुदी नुसार कारवाई करू असे आश्वासन दिले.
पंचनामा करतांना गावातील पोलिस पाटील निलेश नेमाडे , ग्रामपंचायत सदस्य तथा दूध संघ संचालक ठकसेन भास्कर पाटील , निखिल पितांबर भारंबे,संदीप सुरेश टोके ,भास्कर पंढरीनाथ भिरुड,केतन विजय पाटील, चंद्रकांत मिठाराम भारंबे ,कुणाल नारखेडे ,भूषण भंगाळे,जयेश इंगळे ,ग्रामपंचायत कर्मचारी जमील तडवी हे उपस्थित होते.
सदर न्यूज प्रसारित झाली त्यासाठी जयेश इंगळे व माजी उपसरपंच परेश मुकुंदा महाजन यांनी लेवाजगत न्यूजचे आभार व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत