वीर वाजेकर कॉलेजमध्ये पुस्तक प्रदर्शन संपन्न
वीर वाजेकर कॉलेजमध्ये पुस्तक प्रदर्शन संपन्न
लेवाजगत न्यूज प्रतिनिधी उरण सुनिल ठाकूर -फुंडे येथील रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर ए. एस. सी. कॉलेज येथे दि. ९ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाच्या 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' या उपक्रमांतर्गत ग्रंथालय विभागामार्फत पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ग्रंथपाल सुप्रिया नवले यांनी 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा'उपक्रमाची उपयोगिता आणि पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.आमोद ठक्कर सर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना प्र प्राचार्य म्हणाले की, पुस्तके हीच आयुष्याची खरी साथीदार आहेत. जीवन जगताना येणाऱ्या विविध संकटांचा सामना करण्यासाठीचे मनोधैर्य आणि प्रेरणा पुस्तकांच्या वाचनातूनच तर मिळते. पुस्तकांपासूनच प्रेरणा घेऊन मोठी झालेली अनेक लोक आपण समाजात पाहतो, त्यांची चरित्रे, आत्मचरित्रे वाचून त्यांच्या व्यक्तिमत्वामधून प्रेरणा घेऊन तुमचेही भविष्य उज्वल करण्याचा प्रयत्न करा असे आवाहन ही त्यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना केले.
या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयातील विविध विभागांचे प्रमुख व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथालय विभागातील कमल बंगारे व सौ. नर्मदा खरपडे आणि कमवा आणि शिका योजनेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत