मकर संक्रांतीच्या पर्वावर कुंभमेळ्यात महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या सोबत केले सावदा परिसरातील भक्तांनी पवित्र महाकुंभ स्नान
मकर संक्रांतीच्या पर्वावर कुंभमेळ्यात महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या सोबत केले सावदा परिसरातील भक्तांनी पवित्र महाकुंभ स्नान
लेवाजगत न्यूज प्रयागराज -या ठिकाणी संगम स्थळी स्नानाचे पर्व साधताना जगद्गुरु परमपूज्य ज्ञानेश्वरदासजी व परमपूज्य महामंडलेश्वर आचार्य श्री जनार्दनहरीजी महाराज यांच्या सोबत सावदा फैजपूर परिसरातील सर्व त्यांचे अनुयायी यांनी महा कुंभामध्ये मकर संक्रांतीची पर्वणी साधत महाकुंभामध्ये स्नानाचा आनंद लुटला . प्रयागराज येथे संध्याकाळी चार वाजता महास्नानाच्या मिरवणुकीस निर्मल आखाड्यापासून प्रारंभ झाला. मिरवणुकीमध्ये निर्मल आखाड्यातील सर्व जगद्गुरु , महामंडलेश्वर निर्मला आखाड्याचे प्रमुख हे सर्वजण सहभागी झाले होते . जवळजवळ अडीच तास मिरवणूक प्रमुख मार्गावरून निघून संगम स्थळी पोहोचली. त्यावेळेस जगद्गुरु परमपूज्य ज्ञानेश्वरदासजी व परमपूज्य महामंडलेश्वर आचार्य श्री जनार्दन हरी जी महाराज यांच्या सोबत सावदा फैजपूर परिसरातील अनेक अनुयायी त्यांच्यासोबत या ठिकाणी संगम स्थळी उपस्थित होते .
त्यांच्यासोबत फैजपुरचे माजी नगराध्यक्ष बापू वाघुळदे ,पत्रकार संजय सराफ भुसावळ येथील परीक्क्षित बऱ्हाटे , महेश चौधरी (पप्पू दादा ) दिगंबर होले ,अशोक मामा नारखेडे.
सावदा येथील योगेश्वर महाजन , अनिल नेमाडे , प्रकाश वायकोळे ,नंदू पाटील ,गणेश सापकर , शिवाजी भारंबे , किरण गुरव हे उपस्थित होते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत