पीएनबी मेटलाइफची सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेसोबत भागीदारी
पीएनबी मेटलाइफची सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेसोबत भागीदारी
लेवाजगत न्यूज उरण प्रतिनिधी सुनिल ठाकूर : पीएनबी मेटलाइफ इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने (पीएनबी मेटलाइफ) सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या एका सर्वात मोठ्या अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेसोबत एक धोरणात्मक बँकॅश्युरन्स भागीदारी केली आहे. बचत, संरक्षण, निवृत्ती, आणि ग्रुप प्लॅन्सचा समावेश असलेल्या विविध जीवन विमा योजना सारस्वत बँकेच्या देशभरातील 302 शाखांमधील सुमारे 30 लाख ग्राहकांसाठी उपलब्ध करून देत आर्थिक समावेशन वाढवणे आहे, हा या सहकार्याचा उद्देश आहे.
पीएनबी मेटलाइफचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी समीर बन्सल म्हणाले, "भारतामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर विमा संरक्षण पुरेशा प्रमाणात घेतले जात नाही. त्यामुळे अधिक लोकांपर्यंत विमा पोहोचवण्यासाठी व्यापक वितरण चॅनेलची गरज भासत आहे. सारस्वत बँकेसोबतची आमची भागीदारी लाखो भारतीयांपर्यंत जीवन विमा सुलभपणे पोहोचविण्याच्या आमच्या ध्येयाच्या दिशेने उचललेले एक पाऊल आहे. सारस्वत बँकेचा विश्वासार्ह वारसा आणि आमचे विमा क्षेत्रातील विशेषज्ञता यांच्या माध्यमातून, आम्ही ग्राहकांच्या विविध जीवन टप्प्यांवरील आर्थिक गरजांना पूर्ण करणाऱ्या आणि त्यांना आर्थिक संरक्षण प्रदान करणाऱ्या उपाययोजना उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे."
सारस्वत को-ऑपरिव्ह बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आरती पाटील म्हणाल्या, "पीएनबी मेटलाइफसोबतची भागीदारी ही आमच्या ग्राहकांना उत्तम जीवन विमा योजना प्रदान करण्याच्या सततच्या प्रयत्नांचा भाग आहे. भारतातील सर्वात मोठी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक म्हणून, या भागीदारीमुळे आमच्या ग्राहकांच्या आर्थिक कल्याणाच्या प्रत्येक पैलूला समर्पित सेवा देण्याच्या आमच्या दृष्टिकोनाला अधिक बळकटी मिळणार आहे."
पीएनबी मेटलाइफ आणि सारस्वत बँकेच्या बलस्थानांचा प्रभावीपणे उपयोग करून, पीएनबी मेटलाइफ "मिलकर लाइफ आगे बढ़ाएं" ही आपली भूमिका साकार करत आहे. विमा संरक्षणातील तूट भरून काढण्यासाठी, विम्याचे कव्हरेज वाढवण्यासाठी आणि आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देण्यासाठी उपेक्षित आणि विमा न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यास या धोरणात्मक भागीदारीची मदत होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत