सावदा नगर परिषदे कडून दिव्यांग कल्याणकारी निधी वाटप
सावदा नगर परिषदे कडून दिव्यांग कल्याणकारी निधी वाटप
लेवाजगत न्यूज सावदा- येथे दिनांक २६जानेवारी २०२५ रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सावदा शहरातील दिव्यांग बांधवांना दिव्यांग कल्याणकारी निधीचे वाटप पालिकेचे मुख्याधिकारी भूषण वर्मा यांच्या हस्ते माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,अनिता येवले,माजी नगरसेवक फिरोज खान पठाण,करुणा पाटील,सुभद्रा बडगे यांचे उपस्थितीत वाटप करण्यात आले.
सहा लाख ४१ हजार रुपये सावदा शहरातील २३४ दिव्यांग बांधवांच्या खात्यावर टक्केवारीनुसार वाटप करण्यात आला.सदर निधी २०२४-२५चा असून दिव्यांगांना या निधीमुळे थोडाफार हातभार लागणार आहे.शासनाचे सर्व दिव्यांग बंधू-भगिनीतर्फे आभार व्यक्त करण्यात आला.
सदर प्रसंगी सावदा नगरपरिषद मुख्याधिकारी भूषण वर्मा यांचे कडून दिव्यांग कल्याणकारी निधी स्वीकारताना दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था सावदा शहर अध्यक्ष विशाल कासार, उपाध्यक्ष दिलीप जैन,पूजा कासार, संगीता गडे,रवी कानडे,चंद्रकांत नेहेते शहरातील सर्व दिव्यांग बांधव उपस्थित होते.सदर निधी हा दिव्यांग बांधवांच्या बँक खातेवर टक्केवारीनुसार म्हणजेच ४० ते ६० % प्रत्येकी २०००, ६१% ते ८० टक्के प्रत्येकी तीन हजार रुपये ८१% ते १००% चार हजार रुपये प्रत्येकी यांचे खात्यावर आज रोजी वर्ग करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत