चिनावल ग्रामस्थ ब्लिचिंग पावडर विरहित पिताय पिण्याचे पाणी
चिनावल ग्रामस्थ ब्लिचिंग पावडर विरहित पिताय पिण्याचे पाणी
लेवाजगत न्यूज चिनावल:- गावचे नागरिक जयेश इंगळे यांनी चिनवाल ग्रामपंचायत कार्यालयाच्या आगळा वेगळा घोटाळा बाहेर आणलाय.
मागील एक ते दीड महिन्या पासून मोटर खराब असल्याने चिनावल ग्रामस्थ ब्लिचिंग पावडर विरहित पाणी पीत आहे .नेमक हे प्रशासन ग्रामस्थांच्या आरोग्य सोबत खेळत तर नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे. .जयेश इंगळे यांनी ब्लिचिंग पावडरची पाहणी केली असता ती पाच महिने जुनी आढळून आली.आपल्याला ठाऊकच आहे. ब्लिचिंग पावडर ची वापरण्याची मुदत बनवलेल्या तारखे पासून तीन महिने असते. ग्रामपंचायत कार्यालयाने नुकतीच १.५० लक्ष रुपये खर्च करून ब्लिचिंग पावडर ठेवण्यात साठी खोलीचे दुरुस्ती करण केलेले आहे .तशी व्यवस्था असून सुद्धा ब्लिचिंग पावडर घाणेरड्या ठिकाणी ठेवण्यात आली आहे.
या बाबत जयेश इंगळे यांनी ग्रामसेवक कैलास भगत यांना विचारना केली असता आपण ब्लिचिंग पावडर रोज टाकतो असे सांगण्यात आले.
पण प्रत्यक्षात पाणीपुरवठा गावामध्ये होत असला तरी त्यात ब्लिचिंग पावडर पाणी शुद्ध करण्यासाठी टाकली जात नाही व जी टाकली जात आहे ती त्याची मुदत संपलेली आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष द्यावे व गावातील नागरिकांचे आरोग्यास बाधा होणार नाही यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी ही जयेश इंगळे यांनी केली आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत