फैजपूर येथिल जे.टी.महाजन पॉलिटेक्निक येथे वार्षिक स्नेह सम्मेलन "सूजन-२०२५ उत्साहात
फैजपूर येथिल जे.टी.महाजन पॉलिटेक्निक येथे वार्षिक स्नेह सम्मेलन "सूजन-२०२५ उत्साहात
लेवाजगत न्यूज फैजपूर-येथिल जे.टी. महाजन पॉलिटेक्निक येथे वार्षिक स्नेहसंमेलन "सृजन २०२५ " गुरुवार दि. ३०/१/२०२५ रोजी संपन्न झाले "सृजन २०२५" या वार्षिक स्नेह संम्मेलनात दि.३१/०१/२०२५ रोजी सकाळी ०९.३० वाजता रक्तदान शिबिर आयोजित केलेले होते. त्या नंतर माजी विद्यार्थ्यांची मीटिंग संपन्न झाली . त्यात माजी विद्यार्थ्यांनी आपले पदविका अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर संस्थेत घेतलेल्या शिक्षणाचा नोकरीच्या ठिकाणी कसा उपयोग होतो असे सांगून आपले मनोगत व्यक्त केले. नंतर सुजन २०२५ मध्ये झालेल्या विविध स्पर्धा व खेळ यांच्या मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्राविण्य संपदान केले त्यांना संस्थेचे उपाध्यक्ष उल्हास निंबा चौधरी, मानद सचिव विजय रघुनाथ झोपे, मानद सहसचिव शशिकांत रामचंद्र चौधरी, संचालक विजय परदेशी , प्रभाकर भोजू सरोदे यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभात पदक व पारितोषक देण्यात आले . नंतर मान्यवरांची भाषणे झाली. शेवटी संचालक व कार्यक्रमाचे पाहुणे , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी यांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला. अशा प्रकारे वार्षिक स्नेहसंमेलन "सृजन २०२५ "हे संपन्न झाले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत